NiKi

NiKi

Friday, June 14, 2013

नेहमी हसण गरजेच नाही
कधी रडायला पण हवं
आयुष्याच्या दारावरती
आसवांच एक तोरण हवं

का म्हणून नेहमी दिवसाचीच अपेक्षा धरावी ?
कधीतरी रात्र हि जगून बघावी ......................
नाजूक ह्या मनाला
ठेच जराशी खाऊ द्यावी............................

देऊन ठेच मनाला
त्याला हि रक्ताळू द्यावं ...................
डोळ्यांना पाझरू द्यावं
नवीन जखमांना होऊ द्यावं ...............

नवीन जखमा, नवीन आठवणी
नवे सल मनात दाटून येतील .......................
आयुष्याचा हा पेटारा
नकळतच थोडासा पुन्हा भरला जाईल .............

कान बधीर मन सुन्न
वाचा शांत , डोळे बंद
एकलेपणाचा निवांत घ्यावा आस्वाद
कधीतरी जगावं एकटंच, फक्त आपल्याच विश्वात .......

No comments:

Post a Comment