NiKi

NiKi

Wednesday, June 5, 2013

मी तुझी तू माझा

मी तुझी तू माझा

तू माझा प्राण सखा

अंतरीच्या गंध कळीला

उमलण्या श्वास तुझा

तू भ्रमर मी कुसुम

घालतसे  रुंजी मना

तू साद मी पडसाद

तुझा माझा सुख संवाद

तू सागर मी सरिता

मिलन त्यांचे मनात

मी आत्मा तू परमात्मा

युगा युगाचे अतूट बंधन

मी तुझी तू माझा

तू माझा प्राण सखा

No comments:

Post a Comment