NiKi

NiKi

Wednesday, June 5, 2013

ती चांदणी रात्र सखे,
सोबत तु साथीला...
तुझे निखळ सौदर्य पहात,
मी हा असा झिंगलेला...

शृंगाराची शय्याही ती,
बघ ना कशी सजलेली...
तुही अशी तिच्यावरती,
नव्यानवरीसम नटलेली...

निळेशार कुंतल तुझे,
मानेवरती रुळलेले...
मनही माझं वेडच ते,
त्यांच्यातच गुंतलेले...

गौरवर्णीय  अंगकांती ,
थरथरनारे ओठ तुझे...
ओठ तुझे मिठीत घ्याया,
ओठ माझे आसुसले... 

तुझ्या सागरी डोळ्यांच्या,
डोहात पार मी बुडलो...
नकळले मला कधी मी,
तुझ्या बाहुपाशात जखडलो...

तुझ्या गालांवर लाली,
बघ ना कशी फुलली...
तुझ्या गालांची मधुर खळी ती,
माझ्या ओठांआड दडली...

तुझ्या मधाळ ओठांशी,
माझे ओठ जुळले...
तुझ्या घट्ठ मिठीत नखांचे,
माझ्या पाठीवर व्रण उमटले ...

तुझी घट्ट मिठी ती,
तुझे उष्ण श्वास...
ती मनमोहिणी रजनी,
आणि मी मदहोश...

No comments:

Post a Comment