NiKi

NiKi

Monday, June 3, 2013


या आठवणींना डोळ्यात
साठवू कसा मी
सांग तुझ्यात साठलेले
क्षन गोठवू कसा मी

मी सुखात तुझ्या
स्वार्थ शोधतो आता
सांग तुझिया आठवणींना
आठवू कसा मी

वाटला मज स्वर्ग
ठेंगणा होता जेव्हा
डोळ्यात अश्रू पुन्हा
दाटवू कसा मी
झुळूक वार्याची
मज बेभान करते
सांग ह्या वादळास
पाठवू कसा मी

मी कधी तुझ्यात असा
गुंतून कसा गेलो ?
सांग ह्या स्वप्नांना
थाटवू कसा मी

ह्या बोलक्या ओठांची
शपथ होती तुला
सांग शब्द पुन्हा
मुखी बाटवू कसा मी




No comments:

Post a Comment