NiKi

NiKi

Friday, June 28, 2013

तिने बेचैन होतांना
कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देतांना
जीवाचे चांदणे व्हावे
कधी ते डाव मांडावे
कधी हसून मोडावे
तिच्या रुसव्यात शब्दांचे
दुहेरी बोलणे व्हावे
किती मोजू तऱ्हा आता
तिच्या त्या वार करण्याच्या
तिच्या हाती कट्यारीने
सुखाचे खेळणे व्हावे
तिच्या डोळ्यातले पक्षी
फुलांचे सोबती होते
किती दारंग स्वप्नांचे
निजेवर सांडणे व्हावे ..
तिने बेचैन होतांना
कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देतांना
जीवाचे चांदणे व्हावे .. ♥♥

Tuesday, June 25, 2013


"तुझ्या डोळ्यांत कसं आज चांदण हसती...
जसा चंद्र करतो रोज ढगांत मसती ....."

"तुझ्या हाती चांदण...तुझे हात चांदण्याचे....
आज चंद्र वाट पाही तुझे हात लागण्याचे..."

"बघे रोखून नजर तुला... चंद्र हा मुजोर...
झुरे हातातलं बघून तुझ्या.. चांदण बिल्लोर..."

"भिजे चांदण्याची वाट.. कसा पडला पाऊस...?
सखा तुझा चंद्र आहे ...त्याचे घर तुलाच ठाऊक...!!"

"जसा पदर ढळतो ना... तशी तू रात्र हि ढळू दे...
आज माझ्यासकट चांदण्यांची रात्र हि जळू दे...!!!"

"आज चांदण्यांचा बघ कुणी शिंपिला हा सडा...!!
तुझ्या वाटेत जणू ...कुणी चंद्रच उधडला...."

"आज..चंद्र..चांदण्या...आणि तुझी हि सोबत...!
आज कळले मला..निळ्या नभाचे गुपित....!!!

"आज अल्याड चांदण....आज पल्याड चांदण....
आज चंद्र आहे चोर...त्याच्या मनात चांदण..."





माझ्या मनात रुजलेली,
तुझी हरएक आठवण....
तुझ्या सहवासात सजलेला
जगलेला...प्रत्येक क्षण...
हे सारचं कसं....
नेहमीच पुन्हा नव्यानं जन्मलेलं.....
प्रत्येकवेळी तितकचं नाविण्य...
तितकीच ओढ घेऊन मनात येतं....
अन मग मनाची पाऊलं घेतात धाव ...
तुझ्याच दिशेनं....
अगदी बेभान होऊन....
तु माझाच आहेस हे ठाऊक असुनही....
का? तुझ्याच अस्तित्वाचा शोध घेत रे मन....
प्रत्येक वस्तुत...प्रत्येक अणु-रेणुत....
तुझ्या असण्याचा भास होतो मनाला....
प्रत्येक क्षणाला तुझ्या प्रेमात पडते मी जणु....
पुन्हा नव्याने.....







तुझ्या आठवणी मी खूप जपून ठेवणार आहे
कारण, तुझ्या बाबतीत
मी फारच हळूवार भावनांत गुंतलो आहे

आपल्या मैत्रीचे भावबंध,
आयुष्यभर टिकावेत अशी आपली इच्छा होती
पण, सर्वच इच्छा पूर्ण होण्यासाठी नसतात
परिस्थिती,
खरंच, कधी कधी खूप घात करते ती,
आपल्या भावनांचा, आपल्या अपेक्षांचा, आपल्या स्वप्नांचा

भावनांना सावरणं, हे तर तूच मला शिकवलंस
इतरांबाबत मी तर माझ्या भावना सावरल्या
पण तुझ्याच बाबतीत मी त्यांना कसा सावरु?

तरीदेखील मी माझ्या भावनांना सावरणार आहे
कारण मी त्यांना सावरलं नाही तर तो
तुझ्या-माझ्या मैत्रीचा अपमान होईल

एकमेकांना समजून घेणं, हाच
आपल्या मैत्रीतील खरा भावबंध
एकमेकांपासून दूर राहुनही हे
भावबंध आपल्याला जपायचे आहेत
कितीही हृदय भरुन आले तरी
मला तुझ्या आठवणी जपायच्या आहेत.


तुझ्या आठवणीत
रात्र-रात्र
जागावसं वाटतं,
तुझ्या आठवणीत
क्षण-क्षण रडत
बसावसं वाटतं...
तुझ्या आठवणीतचं
तुझ्याचंसाठी जगतोय मी
हे ओरडून-ओरडून सांगावसं वाटतं,
तुझ्या आठवणीत
एकदा का होईना
खोटं-खोटं
मरावसं वाटतं...
माहीत आहे भेटणारस तु मला,
तरीही देवाकडे प्रत्येक वरदानात
फक्त आणि फक्त तुलाचं
मागवसं वाटतं.....
हसू माझ्या ओठांवरचं,
तुझ्या ओठांवरती द्यायचंय...
डोळ्यातल्या आसवांना तुझ्या,
पापणीखाली घ्यायचंय...
सतजन्माच्या सूत्रात,
सखे तुला बांधायचंय...
ठेवून तुला काळजात,
तुझ्या काळजात मला रहायचंय..
तुझे प्रेम म्हणजे असे
उत्तुंग शिखरावर उभे राहणे
तुझे प्रेम म्हणजे असे
खोल खोल दरीत स्वत: ला झोकून देणे जसे
तुझे प्रेम म्हणजे
पहाटे पहाटे फ़ुलावरच्या दवाला टिपणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
नदीच्या अवखळ पाण्याबरोबर वाहत जाणे
जसे तुझे प्रेम म्हणजे असे
भर पावसात भिजणारे पारिजातक जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
कुडकुडणार्‍या थंडीत शेकोटीतले कोळसे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
वार्‍यासंगे उडणारे पतंग जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
उन्हाळ्याच्या रोहीणीत तापणारा सुर्यप्रकाश जसे..........!!

मलाही वाटत...
तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव,
तुझ्या डोळ्यात मला ते दिसाव..

मलाही वाटत..
तुझ्या बरोबर खुप काही बोलाव,
मग खुप बोलून थोडा वेळ शांत राहाव..

मलाही वाटत...
तू मला जवळ घ्याव,
मीठी मारून मला घट्ट धराव..

मलाही वाटत...
तुझ्या बरोबर खुप भांडाव,
भांडण मिटवून परत गोड व्हाव...

मलाही वाटत...
तुझ्या सुखात सामिल होऊंन घ्याव,
मग त्यापेक्षाही तुला खुप सुख द्याव...




तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात
कोणिच
कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत
माझ्याशिवाय
कोणीच नसेल,
हसतेस एवढी छान की हसत
रहायला शिकवलेसतु,
बोलतेस एवढी छान की बोलत
रहायला शिकवलेस तु,
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले
तरमला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तर
मधूरसंगिताची मला गरज नाही,
जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर
काही ऐकण्याची मला गरज नाही,
जर तु माझ्या बरोबर आहेस तर
ह्याजगाची सुध्दा मला गरज नाही...


प्रेम म्हणजे
"आय हेट यु " "आय हेट यु " असे म्हटल्यावर हि
जेव्हा तुमचा जोडीदार एक सुंदर स्मितहास्य देऊन
म्हणतो..
तू असे करूच शकत नाही, मी पैंज लावतो ,
त असे करूच शकत नाहीस
प्रेम म्हणजे
तुम्ही "गुड नाईट" मेसेज पाठविल्यानंतर
जोपर्यंत तुमच्या पार्टनर चा रिप्लाय येत नाही
तोपर्यंत तुम्हाला झोप लागत नाही
आणि थोडक्यात
वरील मजकूर वाचल्यानंतर सर्वप्रथम
जी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येते
ते तुमचे प्रेम"".. 






Monday, June 24, 2013

नेहमी वाटत मला ,
मी काहीतरी चूक करावी ,
आणि तुझ्याकडून मला प्रेमळ
शिक्षा मिळावी ....
झालेल्या जखमेवर माझ्या,
तुझ्याच मायेची फुंकर असावी ......
केलेल्या माझ्या हट्टाना ,
तूच पुरवण्याची आस असावी ...........
असेल दु:खात तेव्हा ,
तुझ्याच सोबतीची जोड असावी .. ......
न बोलता माझ्या वेदना ,
कधी तुही समजून जाव्या......
तोल जाता माझा ,
सावरणारे हात तुझेच असावे ..........
माझ्या आठवणीत एकांतपणी,
कधी तुही रमावं.......... ..
मैत्रीच्या पलीकडे कधीतरी,
तुही काही बोलावं ...............
आजहि मला ,
या अपेक्षांचा भास होतो
आणि न कळत तू त्या नेहमीप्रमाणे
मोडतो ........

रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं. . . .[♥]
सुगंधी असं ते एक चंदन असतं,
पावसात कधी ते भिजत असतं
वसंतात कधी ते हसत असतं,
जवळ असताना जाणवत नसतं,. . . .[♥]

दूर असताना रहावत नसतं,
प्रेमाचं नातं हे असच असतं,
म्हणुन ते जपायचं असतं..
काही नाती जोडली जातात,. . . .[♥]
कही जोडावी लागतात
काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली जातात
यालाच तर प्रेम म्हणतात !. . . .[♥]




YOu really mean the wOrld tO me
I asked myself, hOw cOuld this be?
I really I♥ve y♥u with all my heart
I dread the mOments we are apart
YOu’re there fOr me, thrOugh goOd and bad
YOu’re my everything; yOu’re all I have
I hOpe yOu nOticed, the way I feel
I hOpe yOu nOticed, that these feelings are real
When yOu near me I feel sO secure
I hOpe that Our l♥ve will fOrever endure
YOu revealed yOur true l♥ve tO me
YOu revealed a l♥ve; I never thOught I’d see
I think abOut yOu day after day
I really l♥ve y♥u what mOre can I say
I’m glad yOu came intO my life
I’m glad I feel this way inside
I’ll end this pOem with an I l♥ve y♥u
Please believe, my l♥ve fOr yOu is true
I hOpe we really are meant tO be
I hOpe yOu knOw, yOu are the wOrld tO me.. !
आयुष्यत देवाकडे पहिल्यांदा मागणी केली
तू सुखी रहावीस म्हणून विनवणी केली
तू कितीही रागावलीस तरी माजे मन मोडणार नाही
कारण,तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावर माझा जीव जडणार नाही
तू कितीही धिक्कारलास तरी मी तुजाच असेन
कारण तुझ्याशिवाय हे आयुष्य कवडी मोलाचे हि नसेन
रोज एका नव्या रुपात
समोर येतेस तू
रोज एक नवा अनोखा
आनंद देतेस तू

... रोज नवेच रूप पाहून
मी विचार करतो
तू आहेस अथांग, मलातर
फक्त थेंबच दिसतो
आश्चर्याची झालर असलेली
लाट होतेस तू
रोज एक नवा अनोखा
आनंद देतेस तू

मी ठरवतो तुला बघून
अचंभित नाही व्हायचे
तुझे कातिल हावभाव
कसले निर्णय टिकायचे
हृदयाच्या आत खोल
घुसत जातेस तू
रोज एक नवा अनोखा
आनंद देतेस तू
मी कवी नाही ........
मी छान लिहितो ..असं जवळचे म्हणतात
मी भावना व्यक्त करतो ..त्यालाच कविता समजतात

पण मीच स्पष्ट करतो ..मी कुणीही कवी नाही
हे जे काय लिहितो ..त्याच श्रेयही माझं नाही
ती जीवनात आली ..न सहवासात गुंतत गेलो
काही कळलं नाही ...शब्दात कसा हरवत गेलो
माझ्या कविता म्हणजे ..तिचा न माझा संवाद असतो.....
तू रागावलीस ना....
कि मला मज्जा येते......
तू रागावलीस ना...
कि मला मज्जा येते......

तुझे गोरे गोरे गाल..
लाल चुटूक होतात..
मोठ्ठे मोठ्ठे डोळे तुझे ,,
छोटे बुटुक होतात ...

रागावलेल्या चेहरयावर..
चढतो असा पारा.....
उकडायला लागतो भोवतीचा..
गार गार वारा ...

ऐकत नाही मग माझे...
मी कितीही बोललो तरीही ...
तुझ्या रागाच्या बीने वर...
नाग बनून डोललो तरीही...

मी मनवावे तुला म्हणून
तू माझ्याशी बोलत नाही...
कित्तीकित्ती सॉरी म्हटले तरीही ...
तुझा 'दगड' काही हलत नाही,,,

तू रागावलीस ना...
कि मला मज्जा येते......
पण.......
"खूप लोक येतात आयुष्यात
आपल्याला जीव लावतात...
मग रागावतात अचानक अन
न सांगता निघून जातात..."

"कितीही शोध त्यांना
बोलवा त्यांना किती ...
त्यांच्या आठवांची झोळी
कधी होत नाही रिती ...."
.
खर सांगू....
"तू माझ्यावर असे कधीच रागाऊ नको ...
.
तू रागावलीस ना...
कि मला मज्जा येते......
पण तुझ्या अश्या रागावण्याने
मला सजा होते...
पण तुझ्या अश्या रागावण्याने
मला सजा होते...----

Wednesday, June 19, 2013

तुला पाहता.... .





कुणी मुग्ध बेहोश शुद्धीत यावा, तुला पाहता
कुणी झिंगुनी धुंद हरपेल वाचा, तुला पाहता

कुणी मोजतो चंद्रिकांना नभीच्या जरी रात ना
कुणी स्तब्ध होई जसा खुद्द तारा, तुला पाहता

कुणी गान गाई नसे भान त्याला कुठेही असो
कुणी शब्दवेडा लिही फक्त गजला, तुला पाहता

कुणी 'चंद्र' नामी हरवलाच आहे कसा ठाव ना
कुणी तोडतो त्या गुलाबी गुलाबा, तुला पाहता

कुणी प्रार्थनाही करेना अता जाऊनी देऊळी
कुणी फक्त मागे “हवी 'ही'च मजला”, तुला पाहता

कुणी बोल लावी नशीबास का मी नसे लाघवी
कुणी धन्यता मानतो ह्याच जन्मा, तुला पाहता

कुणी बायकोच्या सवे राहुनी माग काढी तुझा
कुणी बायकोला म्हणे "तू हिडिंबा", तुला पाहता

कुणी ह्या रण्याच्या म्हणे शायरीला "अरे बात क्या!"
कुणी गालिबाने भुलावे रदीफ़ा, तुला पाहता!!

पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!
तुझ्या-माझ्या ओल्या भेटीचे क्षण परत एकदा रोमांचित करुन गेले....!
अचानक बरसलेल्या त्या पावसाने मनातले भाव खोलवर नेले....!
तोच होता अविस्मरनिय दिवस जिथे तुझे-माझे अंतर संपले...!
त्याच पावसात काही गमावल्याचे व्रण खोलवर दडले होते......!
त्याच पावसात तुझ्या प्रेमाने मला नकळत कवेत ओढले होते.......!
पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!
तुझ्या-माझ्या ओल्या भेटीचे क्षण परत एकदा रोमांचित करुन गेले....!
अचानक बरसलेल्या त्या पावसाने मनातले भाव खोलवर नेले....!
तोच होता अविस्मरनिय दिवस जिथे तुझे-माझे अंतर संपले...!
त्याच पावसात काही गमावल्याचे व्रण खोलवर दडले होते......!
त्याच पावसात तुझ्या प्रेमाने मला नकळत कवेत ओढले होते...

ती रुसते तेव्हा... .



ती रुसते तेव्हा अजून थोडे गाल गुलाबी होती
अन् अधरपाकळ्या किंचित मुडपुन लाल मोगरा होती!

ती रुसते तेव्हा सुगंध वारा शांत शांतसा होतो
तो रेंगाळुन मग इथे तिथे का बावरलेला होतो?

ती रुसते तेव्हा मधुघट डोळ्यामधले झरझर भरती
मी "नको नको" म्हणतानाही ते थेंब थेंब पाझरती!

ती रुसते तेव्हा नाकावरती चढते रक्तिम लाली
मग एक मोकळी मुजोर बट ती भिरभिर करते भाली!

ती रुसते तेव्हा फक्त बोलतो सागर खळखळणारा
त्या लाटांवरती शब्द मनाचा झुरतो कळवळणारा!

ती रुसते तेव्हा उठे वेदना कुठे तेच ना कळते
मी उदासडोही विरघळतो अन् बोच अनामिक छळते!
तुझी भेट व्हावी म्हणूनी जरासा
पुन्हा त्या किनाऱ्याकडे चाललो
जिथे पावलांची दिसे रोज नक्षी
पुन्हा त्याच वाटेत रेंगाळलो


तुझी भेट व्हावी क्षणाएव्हढीही
पुरे ती मला, जन्म सोसेन मी
तुझे रूप डोळ्यामध्ये साठवूनी
तुझा शब्द हृदयात कोरेन मी


तुझी भेट व्हावी कधी चांदराती
दिसावे मला चंद्र दोन्ही जुळे
मला एक वेडी नशा होत जावी
तुझ्या चांदण्याच्या सुवासामुळे


तुझी भेट व्हावी अशी चिंब ओली
मिळावी जरा ऊब श्वासांतुनी
मुकी आसवे वाहुनी तृप्त व्हावे
कळे ना कुणा धार डोळ्यांतुनी


तुझी भेट व्हावी सुटे बंध होता
मिटावी न माझी दुखी पापणी
तुला आकळावी नसे बोललो जी
मनाची कहाणी सुन्या जीवनी!
तुझे नी माझे नाते काय?
तु देणारी मी … मी घेणारा
तु घेणारी … मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय ?
तुझे नी माझे नाते काय?
सुखदु: खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय?

तुला स्मरता सहजची
मनात फुलतो वसंत
आणि उद्विग्न मन
क्षणात होते शांत..........

आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन झोके घेते निवांत
आणि क्षणासाठी का होईना
त्याला पडते जगाची भ्रांत.........

त्या मनाचा तेव्हा
ना लागतो मलाच अंत
पण आनंदाचे सोहळे तेव्हा
तो भोगतो नखशिखांत............

मनी एक प्रतिमा तेव्हा
उमटते जणू रविकांत
मन विहार करून येई
गाठून एक विलक्षण प्रांत...........

पण क्षणात संपतो हा सोहळा
आणि मन पुन्हा मांडते आकांत
असेच काहीसे चालू राहायचे
कदाचित माझ्या अंतापर्यंत.........



हेच खरं " प्रेम " असतं.... .
पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे " आकर्षण " असतं♥,
परत पहावसं वाटणं हा " मोह "असतो♥,
त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही " ओढ " असते♥,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा " अनुभव " असतो♥,
आणी त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं " प्रेम " असतं♥!




स्वप्ने माझी तुझ्यापासून
आठवणी हि मिळाल्या तुझ्या पासून
तू तर दूर आहेस माझ्यापासून
पण नाही वेगळा हृदयापासून..

रेशीम गाठी जन्मोजन्मीच्या
जुळल्या दोन मनांच्या
तोड नाही त्याला कशाची
भीती कशाला जगाची...

असाच एकदा येउनी जा,
हाल मनीचे कळवूनी जा
स्वप्ने जी पाहतेय मी,
सत्यात ती उतरवुनी जा..

हाल वेड्या मनाचे,
कळतील का रे तुला?
कधी हळुवार पणे अचानक,
मिठीत घेशील का रे मला?

ध्यानी मनी तूच माझ्या,
प्रत्येक श्वासातही तूच,
वेडी माझी प्रीत सख्या रे..
येउनी कधी पाहशील का?

~

तू आली आयुष्यात
मन रवीच झालं
मलाही कळलं नाही
कधी कवीच झालं
दिवसाढवळ्या तुझं
स्वप्न पाहू लागलं
रात्रीही तुला स्वप्नात
घेऊन फिरू लागलं
एकट असतांनाही
वेड्यासारखं हसू लागलं
बेधुंद आयुष्य
मन जगू लागलं
केव्हाही उमलून शब्द
कविता करायला लागलं
त्या शब्दाशब्दात
तुला भेटू लागलं ...

Tuesday, June 18, 2013


कोण आहेस तू माझा... .

कोण आहेस तू माझा, तुला कसं रे सांगू...?
श्वास माझा तू , पण उत्तर शब्दात कसं मांडू?♥

जग माझं आता तुझ्यापासून सुरु होतं,
तुला आठवणंच माझ्या हास्याला आता पुरं होतं..

तुझ्याशिवाय जगणं आता नाही रे जमत,
तुझ्याशिवाय मन आता कुठेच नाही रमत...

अंधारलेल्या वाटेवर हात नाही सोडणार ना?
विश्वास माझा तुझ्यावरचा कधी नाही मोडणार ना?♥

वचन नको मला...पण साथ दे तुझी...
तुझ्या सोबत जगण्याची स्वप्न आहेत माझी..

नको हा दुरावा....आता मला सहन नाही करायचं,
ठरवलंय आता फक्त तुझ्या तुझ्यासोबतच जगायचं...♥♥♥





जमेल का रे तुला कधी
माझ्या डोळ्यात पहाण,
न सापडलेल्या प्रश्नांची उत्तर,
त्याच्यामध्ये शोधात राहणं.....

जमेल का रे तुला कधी
माझ्याशी तासंतास गप्पा मारणं,
मी काहीही न बोलता
माझ्या मनातलं सर्व काही ओळखण....

जमेल का रे तुला कधी
माझ्यावर नीतांत प्रेम करणं,
हळुवार माझ्या भावनांना
अलगदपणे समजून घेणं.....

जमेल का रे तुला कधी
माझा हात हातात घेणं
मी तुझीच आहे ह्याची शाश्वती मला देण.....

जमेल का रे तुला कधी
माझ्य्पासून दूर होण
जमल तरी जाऊ नकोस
मलाच सहन होणार नाही तुझ दुरावण....♥♥♥






मन माझे तुझ्याकडे आहे,
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ...

प्रेमाच्या गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार
झुळूक प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ...

क्षण काही जगलोत सोबत आठवणीत
त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ....

स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ....

जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी तर वेडा झालोच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ....

जशी तू सामावली आहेस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगला
एकरूपता तरी जाणवेल बघ....

नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी.
हवी तर परिक्षा घेऊन बघ.
फक्त परिक्षेचा निकाल पहायला
जगी तुझ्या मला असू दे बस्स....♥♥♥




एक क्षण पुरे..... .

एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,
मनातल्या मनात आठवून गालातल्या गालात हसायला!

एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला,
कानातल्या कानात त्याची धून वाजायला!

एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला!

एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम कराय्ला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला!




फ़क्त प्रीतिचा हात दे... .

आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

हातात माजा प्रीतिचा नेहमीच, तुजा हात दे !

क्षण विरहाचे विसरून आता, मिलनाचे वेध दे !

तुज्या ह्रदयात माज्या प्रीतिची, कली अशीच उमलू दे !

माज्या श्वासात तुज्या सुगंद्याची, जाणीव माला होऊ दे !

नजरेत तुज्या फ़क्त मला, माजी प्रतिमा पाहू दे !

मनात तुज्या नेहामिसाठी, फ़क्त मलाच राहू दे !

आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

मी दुसर काहीच मागणार नाही, फ़क्त प्रीतिचा हात दे !

~

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो!
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो!

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले...
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो!
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो!







लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं!♥

लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं ज्यातला कंटेंट राईट
आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!♥

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं नुकतंच पंख
फ़ुटलेलं क्युट क्युटबर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!♥

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचंसगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!♥

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं!♥

~




एक स्वप्न आहे
तुला खळखळून हसताना पाहणार
तुझ्या डोळ्यातील आनंदाश्रू
बनून गालावर वाहणार....

एक स्वप्न आहे
तुला हळुवार कवेत घेणार
सोबतीने तुझ्या मला
प्रीतीत चिंब भिजवणार....

एक स्वप्न आहे
तुझ्या भविष्यात हरवणार
तू दूर असताना मात्र
आयुष्य शून्य जाणवणार....

एक स्वप्न आहे
तूच सार जीवन बनून
संगतीने तुझ्या जगणार
तुझ्याच डोळ्यांनी स्वप्न पाहणारं
एक स्वप्न आहे.....




विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!♥

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!♥

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!♥

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!♥



Monday, June 17, 2013

साधारण शी सजणारी..
आणि हळुवार लाजणारी..
गोजिरी दिसणारी..
आणि खूप गोड हसणारी...
अशीच एक मुलगी..
काल स्वप्ना मधी दिसली..
आणि मला बघून हसली..
कोण जाने कशी माझ्या स्वप्नात घुसली..
आणि माझ्या हृदयात घर करून बसली..
गुलाब सारखे लाल ओठ..
सागरा सारखे डोळे..
तिचे केस..वेली सारखे लांब
आणि नभा सारखे काळे
तिला मी बघितलं श्वेत फुलांच्या वनात..
अन पूर्ण साठवल माझ्या मनात..
तिच्या पैन्जानीचा आवाज
आणखी पण तसाच कानात गुंजतो..
आणि सांगतो.आहे .मी तुझीच आहे.!!
मी तुझीच आहे..
पण कुणीतरी माझी चादर ओढली..
आणि माझी साखर झोप मोडली..
परत कधी येशील ग प्रिये.स्वप्नात ..
आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात..

मैत्री ...
तिची नी माझी !!
तिची माझी गोष्ट जरा वेगळीच आहे ,
म्हणायलां मैत्री पण जगावेगळी कहाणी आहे..
.
दररोज रुसवाफुगवी अन वादावादी आहे ,
म्हणायला जिवलग पण विळा-भोपळ्याची जोडी आहे..
.
दुर कोसांवर दोघांची घरटी आहेत...
दिसायला विभक्त पण मनाने एकरूपी आहे...
.
एकत्र येण्यासाठी नाना खटाटोपी आहेत..
भेटल्यावर अळीमिळी पण जन्माची गट्टी आहे...
.
खरंच सांगतो तुम्हाला अनोखी भट्टी आहे..
दूर एकमेकांपासून आहे पण अगदी जिवलग अशी मैत्री आहे .....!!




तुझी माझी मैत्री लपली होती कुठे..

भेटायाचे होते आपल्याला कुठे ना कुठे ....
मला सांग तू लपला होतास कुठे ? भेटून भेटून झाली आपली भेट इथे तू तिथे मी इथे आता तरी का लपनडाव खेलतोस इथे मला सांग तू लपला होतास कुठे ?

ओळख झाली मैत्री ही झाली....
गप्पा रंगल्या, वाद ही झाले, एक नव नाते जन्माला आले...
तू गेलास आणि परत आलास... अणि आपली मैत्री जीवंत केलीस ...

मला सांग तू लपला होतास कुठे ?
तुझी माझी मैत्री लपली होती कुठे..
भेटायाचे होते आपल्याला कुठे ना कुठे ...♥♥
आहे एक मैत्रीण माझी

ती प्रत्येक वेळेस माझ्याचकडे पाहते ,

आणि प्रत्येक वेळेस तीला माझीच चिंता खाते.

ती माझ्याशी बोलतांना
थोडी गोंधळते,

तिच्या मनात दुसरच असत
आणि मला तिसरच सांगुन बसते.

मीही तीचे मनातले
सर्वकाही ओळखत असतो,

पण मुद्दामच
विषय बदलत बसतो.

क्षणो क्षणी मलाही
तिचीच आठवन येते,

आठवल्यावर माझे
मनही तृप्त होते.

प्रत्येक वेळेस मला ती काळजी घ्यायला सांगतअसते,

नाही घेतली तर
न बोलण्याची धमकीही देत असते.

मीही तीचा शब्द पाळण्याचा अतोनातप्रयत्न करतो,

तीच्या प्रेमळ भावनानपुढे शेवटी मी हरतो.

मी तीच्या प्रेमळ धमक्यांना थोडसका होईना घाबरत असतो,

आणि वेळात वेळ काढुन तिच्यासाठी कविता लीहीत बसतो.

प्रत्येकाच्यानशिबात
अशी मैत्रीन नसते,

अभिमान वाटतो मला
ती मला मित्र माणते.
भेटींमधला क्षण........... ­ ..
तुला भेटण्याचा विचारही
मनात आनंदाचे तुषार उडवतो
तो भेटींमधला क्षणही
जगणे धुंद करतो
कधी येशील तू
मनी आस लावतो
कधी बघेन तुला
मनात तहान जागवतो
तो इवलासा क्षणही
मला किती झुरवतो
तुला भेटण्यासाठी
माझा अंत पाहतो
पण तो क्षणच
नात्याचा अर्थ सांगतो
तुझ्यावरच प्रेम
तो अजून फुलवतो

Friday, June 14, 2013


तुझा होऊन जगण्यात वेगळाच मजा येतो

दिवसाही चांद रातीत मन भटकत असतो

उन्हासही सावली समजून अंगावर घेत असतो

हवं तेव्हा पावसात मन भिजत असतो

क्षितीजाच्या पलीकडे मन जात असतो

पंख लावून प्रीतीचे तुझ्यासवे उडत असतो

तुला श्वासात भरून मस्त जगत असतो

स्वप्नात का होईना मिठीत तुला पाहत असतो . . .




ते आयुष्याच काय ज्यात.....प्रेम नाही.
ते प्रेमच काय ज्यात...आठवणी नाही,
त्या आठवणीच काय ज्यात...तू नाही,
आणि,..
ती तूच काय जीच्यात ...मी नाही....!!




एक ओंजळ भरुनी
मागावे काही वाटले;
हात हातात घेवूनी
थोडे चालावे वाटले;
न्हावून तुझ्या प्रीतीत
रंगुनी जावे वाटले;
मिठीत या तुझ्या
असेच हरवावे वाटले;
हळव्या या डोळ्यात
रूप हे तुझे दाटले;
पाहताच तुला रोज
डोळे खुदकन हसले;
बंध हे रेशमाचे
असेच मी जपले;
मनाच्या पटलावरती
कोरून मी ठेवले;
सारेच हे क्षण
मोहक मला भासले;
भरुनी ओंजळीत जरा
जपून ठेवावे वाटले;


तिने बेचैन होतांना
कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देतांना
जीवाचे चांदणे व्हावे
कधी ते डाव मांडावे
कधी हसून मोडावे
तिच्या रुसव्यात शब्दांचे
दुहेरी बोलणे व्हावे
किती मोजू तऱ्हा आता
तिच्या त्या वार करण्याच्या
तिच्या हाती कट्यारीने
सुखाचे खेळणे व्हावे
तिच्या डोळ्यातले पक्षी
फुलांचे सोबती होते
किती दारंग स्वप्नांचे
निजेवर सांडणे व्हावे ..
तिने बेचैन होतांना
कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देतांना
जीवाचे चांदणे व्हावे .. ♥♥
तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!
तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!
तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!
तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!
तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!
तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!
ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!
तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

" आठवण तुझी "



हृदयाच्या कुठल्यातरी कप्प्यात
सुगंधी फुलाप्रमाणे
दरवळणार्या असतात तुझ्या आठवणी . . .

पावसाच्या पहिल्या सरींनी
अंग न अंग रोमांचित झालेल्या
धरणीप्रमाणे असतात तुझ्या आठवणी.. .

नुकत्याच न्हाऊन निघालेल्या
तरुणीच्या नखशिखांत रसरसणाऱ्या
सौंदर्या प्रमाणे असतात तुझ्या आठवणी . . .

रणरणत्या उन्हात फिरताना
एखाद्या ढगाने अचानक तुमच्यावर
धरलेल्या सावलीप्रमाणे असतात तुझ्या आठवणी . . .

उगाचच झालेल्या जखमेत
ठसठसणाऱ्या वेदनेप्रमाणे
असतात तुझ्या आठवणी . . .

शांतपणे एखाद्या कुठल्या कोपऱ्यात बसल्यावर
उगाचच डोळ्यात
भरून येत असतात तुझ्या आठवणी . . .

हळव्या प्रेमाच्या कबुलीची शाई वाळायच्या अगोदरच
प्रेमपत्राला कुणीतरी आग लावावी,
अन,
त्याने अंगाची लाही लाही व्हावी
धुमसणाऱ्या मनाच्या धगधगत्या
ज्वालांसारख्या असतात तुझ्या आठवणी . . .

अत्तराच्या दरवळणार्या गंधाप्रमाणे
मनाच्या कुपीत आयुष्यभर जपून ठेवाव्यात
अशा तुझ्या आठवणी . . .

पानझडी ने मरणप्राय झालेल्या झाडाला
श्रावण सरींनी दरदरून पालवी फुटावी
अन त्याचे अंग न अंग रोमांचित व्हावे
अशा जीवनदायी सरी प्रमाणे असतात तुझ्या आठवणी . . .

तू आणि तुझ्या आठवणींशिवाय
हल्ली मला काही सुचत नाही
खूप काही करावासा वाटत
पण मन मात्र रमत नाही . . . . . .

" प्रतीक्षा तुझी "

तनामनाला वेधून टाकणारी
अवघ्या जीवनाला व्यापून उरलेली
तुझ्या येण्याची प्रतीक्षा
तुझ्या थरथरत्या स्पर्शाचा आठव
माझ्या सर्वांगाला वेधून घेणारा स्पर्श
अंगाअंगातून ठिणग्या फुलवीत जाणारा
शरीरभर उसळणाऱ्या लाटा
एका मागून येत आदळत राहतात
मागणीच्या लाटा..... तृप्तीच्या किनाऱ्यावर
एक लाट अतृप्ततेची परत जाणारी
पुन्हा मागणीचा वेग घेऊन येण्यासाठी
प्रत्येक अणुरेणु जागा होतो
धाऊ लागतो बेलगाम
शोधू लागतो तुला
खूप खूप हवा आहे
असह्य होऊन जातो विरह
वाटतं तिने यावं.... सर्व शांत शांत करावं





तिला पावसात भिजायला आवडत
आणि मला पावसात भिजताना ती . . . . . .

तिला हसायला खूप आवडत
आणि मला हसताना ती . . . . .

माझ्या काळजाचा ठाव घ्यायला तिला आवडत
आणि मला तसं करताना ती . . . . . .

तिला बोलायला खूप आवडत
आणि मला बोलत असताना ती . . . . .

तिला वाऱ्यावर केसांना झुलवायला आवडत
आणि मला वाऱ्यावर केस झुलवताना ती . . . . ..

तिला स्वप्नं पहायला आवडतात
आणि मला स्वप्नांसारखीच वाटणारी ती . . . .

तिला गुणगुणायला आवडत
आणि मला गजला ऐकवताना ती . . . .

तिला जलधारा खूप आवडतात
आणि मला श्रावण सरीन सारखी ती . . .

तिला डोळ्यातून व्यक्त व्हायला आवडत
आणि मला तिला वाचताना ती . . . .

एक मैत्रीण


एका मैत्रिणीच आयुष्यात काय महत्व असतं
हे तेव्हा समजलं
जेव्हा तिचं माझ्या आयुष्यात येणं झालं
आजच्या फास्ट communication च्या जगात आमची ओळख झाली
बघता बघता तिची माझ्याशी, माझी तिच्याशी चांगलीच गट्टी जमली
कुणाशी नातं बनवायला आधीची ओळख जरुरी असते???
तर नातं घडवण्याची जिद्द तुमच्या मनगटी असावी लागते
एका कोवळ्या रोपट्या प्रमाणे नात्याला जपावं लागतं
आपुलकीची उब देऊन त्याला वाढवावं लागतं
पण एकदा का त्याची मुळे खोल रुजली कि
तेच रोपटं झाड बनून तुमच्या हयातभर
तुम्हाला सावली देतं

सालस , सुंदर, सुसंस्कृत सभ्य
आपल्या तेजानी मला लाखाखी देणारी .....
तिचं हास्य, सुंदर हसरी पहाट जणू
तिचे डोळे, भावनांचे सप्तरंगी इंद्रधनू
मला समजावणारी आणि वेळ पडली तर समजणारी
धीरोदात्त बोलांनी मन शांत करणारी
आपला नातं हळुवार हातांनी जपणारी
मैत्रीपेक्षा मोठा पण, प्रेम पेक्षा कमी ची सीमा ओळखणारी
माझ्या आठवणींशी लपंडाव खेळणारी
नकळतच माझ्या मनात तिचं अस्तित्व जागवणारी
लाजरी बुजरी शांत आणि निःस्वार्थ
मला एकांतात नेहमीच जाणवतं
तिचं दरवळणार अस्तित्व
कुपीतल्या अत्तराच्या मंद सुगंधा सारखं
जाणवतोय मला तिचा माझ्यावरचा अतोनात विश्वास
आणि त्यामुळे आतल्या आत मन सुखावताय खास
मी पण तिच्या विश्वासावर
खरा उतरण्याचा प्रयत्न करतोय
पण माहिती नाही कितपत यशस्वी होईल
कारण तिच्यापुढे मी आणि माझं 'मी' पण
सर्व काही शून्य असतं

खरच तिच्यामुळे नात्यांवर विश्वास आहे
मनात जगण्याची उमेद आहे
प्रेम, विश्वास, त्याग, धैर्य, निष्ठा
यांची ती मूर्तिमंत प्रतिक आहे

खरच आयुष्यात एक खरी खुरी मैत्रीण असणं
अतिशय गरजेचं असतं
आणि तिची किती गरज आहे
हे, ज्याच्या आयुष्यात ती आहे
फक्त त्यालाच कळत असतं .....................

" फक्त तुझ्या डोळ्यांनी "



फक्त तुझ्या डोळ्यांनी
काय जादू केली
हरवलेली माझी दृष्टी
क्षणात जागी झाली

फक्त तुझ्याच डोळ्यांनी
मनावर फुंकर घातली
भडकत असलेली आग
क्षणात शांत झाली

फक्त तुझ्याच डोळ्यांनी
जगण्याची इच्छा जागवली
क्षणात झालेली ओळखी
आज जिवंत झाली

फक्त तुझ्या डोळ्यांनी
आत्मविश्वासाला जागा दिली
काळोखी रात्र सुद्धा
सोबतीला धावून आली

फक्त तुझ्या डोळ्यांनी
अश्रुंनाच जागा दिली
" तुझी आठवण "

आज सकाळी अचानक उचकी लागली
आणि एकदम तुझी आठवण आली
डोळे पाणावले, मनात कळ दाटून आली
ए हे तुझं बरं नाही बघ
सारखं आठवणीत येऊन मला सतावण
आणि बघ ना, मला पण जमत नाही तुझ्यावर रागावणं
सावली बनून तू सतत माझ्या पाठीशी असते
रक्त बनून माझ्या नसा - नसात वाहते
कायमच तुझं माझ्या मनात वास्तव्य असतं
कायम माझं मन तुझ्याच आत्म्यात वसत
कारण माझ आणि तुझं अस्तित्व तसं वेगळं नाहीच
दोन शरीरात वावरणारा आपला एकंच जीव आहे
तुझ्या हृदयाचे ठोके मला माझ्या काळजात जाणवतात
श्वास तुझे माझ्या श्वासांना सुगंधित करतात
तू जेव्हा हसतेस, ओठांवर माझ्या हसू फुलतं
तू जेव्हा रडतेस, मन माझं उदास होतं
सांग मला, हि आपली कुठल्या जन्मीची ओढ आहे
प्रेमात तुझ्या जीवनात या फुलला मोगऱ्याचा पाट आहे
आयुष्य माझं तुझ्या विना अपूर्ण आहे
आता सांग, माझ्या प्रेमात काय कमी राहिलं?
आठवणीत माझ्या येऊन तुझ मला का सतावण असतं?
ए नको ग अशी वागू, माझ्या मनाला नको ग अशी छळू
कळतं ग मला, तुझ माझ्यावरच निस्सीम प्रेम
म्हणूनच मी पण तुझ्या प्रेमाच्या कसोटीवर
खरा उतरण्याचा प्रयत्न करतोय
आणि म्हणूनच आठवणींना तुझ्या , मी कवेत घेऊन जगतो आहे .....
नेहमी हसण गरजेच नाही
कधी रडायला पण हवं
आयुष्याच्या दारावरती
आसवांच एक तोरण हवं

का म्हणून नेहमी दिवसाचीच अपेक्षा धरावी ?
कधीतरी रात्र हि जगून बघावी ......................
नाजूक ह्या मनाला
ठेच जराशी खाऊ द्यावी............................

देऊन ठेच मनाला
त्याला हि रक्ताळू द्यावं ...................
डोळ्यांना पाझरू द्यावं
नवीन जखमांना होऊ द्यावं ...............

नवीन जखमा, नवीन आठवणी
नवे सल मनात दाटून येतील .......................
आयुष्याचा हा पेटारा
नकळतच थोडासा पुन्हा भरला जाईल .............

कान बधीर मन सुन्न
वाचा शांत , डोळे बंद
एकलेपणाचा निवांत घ्यावा आस्वाद
कधीतरी जगावं एकटंच, फक्त आपल्याच विश्वात .......

मुझको तेरी खुबिया और खामिया सब है अजीज
तू मुझे कुछ कुछ नही, सारे का सारा चाहिये
वो मोहब्बते जो तुम्हारे दिल में है
उनको जुबान पार लाओ और बयान कर दो
आज बस तुम कहो और केहते हि जाओ
हम बस सुने ऐसा बे जुबान कर दो
आ जाओ के ऐसा टूट कर चाहु तुम्हे
हमारी मोहब्बत को मोहब्बत का निशान कर दो
अपने दिल में इस तरह छुपा लो मुझ को
रहू हमेशा इस में, ऐसा मेरा मकान कर दो




Tuesday, June 11, 2013

राधा म्हणजे प्रेम...
राधा म्हणजे परम भक्ती..
.राधा म्हणजे निरामय आणि निरपेक्ष प्रेम 
राधा म्हणजे उत्कटता आणि राधा म्हणजेच सात्विकता !!

राधेने कॄष्णावर अमर्याद प्रेम केलं. त्या प्रेमाचे, त्या भक्तीचे गोडवे आजही गायले जातात. आयुष्यात असं राधेसारखं प्रेम आपल्यालाही करता यावं, ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते...स्वत:तल्या राधेचा प्रत्येकीचा शोध कायम असतो. नेहमीच आयुष्यात कुठलेतरी रंग सापडतात आणि कुठलेतरी हरवतात. स्वत:तल्या हरवलेल्या रंगाचा शोध प्रत्येक राधा घेत असते...या हरवलेल्या रंगाचा, प्रेमाचा शोध घेताना अख्ख्या जगाशी दावा मांडावा लागतो...पण तो दावा मांडला तरी आपल्या कॄष्णावर तिला खरंच हक्क गाजवता येतो ?    पण राधेला कुणावरही हक्क नकोय, कुठलेही अधिकार नकोयत. तिला हवंय निरलस निरागस आणि निस्सीम प्रेम.

Monday, June 10, 2013


एकदा वाटलं पाऊस होऊन बघावं
अन तुझ्या अंगणात बरसावं,
पण मनानं म्हटलं जाऊ देत
पाऊस गेल्यावर तू अंगणातून बाजूला का सरावं...?

पुन्हा वाटलं ऊन होऊन बघावं
त्या सोनेरी किरणांनी तुला न्हाऊ घालावं,
पण मनानं म्हटलं जाऊ देत
त्याच्याकडे पाहून तू डोळ्याला का झाकावं.....?

पुन्हा वाटलं चंद्र होऊन बघावं
तुझ्या खिडकीत येऊन तुला पहावं,
पण मनानं म्हटलं जाऊ देत
त्याच्याकडे पाहून तू झोपी का जावं.....?

शेवटी मनानं म्हटलं.....
एकदा स्वत: तुझ्यासमोर यावं
अन त्या क्षणी तू फक्त
मला अन मलाच पहावं.....♥♥♥






जर तुझे स्मितहास्य मला मिळाले
तर मला फुलांची गरज नाही
जर तुझा आवाज मला मिळाला
तर मधुर संगीताची मला गरज नाही
जात तू माझ्याशी बोलतोस
तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही
जर तू माझ्या बरोबर आहेस
तर ह्या जगाची सुद्धा मला गरज नाही"





खरचं........... प्रेम म्हणजे काय असतं ?
तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं....
ते प्रेम असतं.......

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा ..... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं.....
ते प्रेम असतं.......

जेव्हा तिच्या आठवणीच........ तुमचा श्वास बनतातं..........
ते प्रेम असतं......

जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल ..... तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते .....
ते प्रेम असतं.....

तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी ..... नकळत सांगुन जाते की ...... या जगात आपलं हक्काचं कुणीतरी आहे.....ते प्रेम असतं......

जेथे शब्दांची गरज नसतेच कधी......एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो.....न बोलताच भावना व्यक्त होतात.....ते प्रेम असतं ......

विरहाचा प्रत्येक क्षण जेथे ...... युगांसमान भासतो .....
ते प्रेम असतं ......

चांदण्या रात्रीतील रेश्मी स्वप्नं ..... दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं ..... काही हळुवार क्षणांना दोघंही जिवापाड जपतातं .... ते प्रेम असतं ......

जेथे असतात तिच्या नजरांचे तीक्ष्ण बाण......अन् त्यांच अचुक लक्ष्य असतात तुम्ही
हेच .......... हेच तर प्रेम असतं .........♥♥♥
तू बरोबर असतेस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं,
दाबून ठेवावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,
नाहीतर खिडकीतूनच,
पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...!
नकळत का होईना
मी तुझ्या जवळ आलो....

जवळ तुझ्या येताना
मलाच मी हरवून बसलो.....

मनातील भाव सांगता
शब्दांना सहज विसरलो......

सहजता होती स्पर्शाला
मी निशब्द होवून बोललो......

कधी कसे ठावे कुणाला
न मागता तुझा होवुनी बसलो....

आहेस तु सावरायला
म्हणुन पडायला ही आवडत.....♥♥♥♥♥♥
♥♥♥
आहेस तु डोळे पुसायला
म्हणुन रडायला हि आवडत.....♥♥♥
♥♥♥
आहेस तु मनवायला
म्हणुन रुसायला ही आवडत.....
♥♥♥
आहेस तु पहायला
म्हणुन सजायला हि आवडत.....
♥♥♥
आहेस तु सोबत
म्हणुन जगायला ही आवडत.....
♥♥♥


 
"तुझ्या नाजूक शरीरावर कोसळणाऱ्या "पाण्याच्या सरी"
पावसाच्या पाण्यात तुझे चिंब भिजलेले केस
तुझ्या ओठावरून ओघळणारा तो "पाण्याचा थेंब"
तू हाताच्या ओंजळीत घेतलेलं ते "नभाच पाणी"
तुझ्या कोमल गालावरून घसरणार ते "झाडाचं पान" या सर्व गोष्टी तुझ्या सहवासात असताना ;
स्वतःला खूप नशीबवान समजतात
पण त्यांना हे माहित नाहीये ...,,
त्याचं तुझ्या आयुष्यात असण ...तितक महत्वाच नाहीये... जर त्यावेळी तुझ्यासोबत मी नसेन....!!!"
शब्दात जे, मी न बोलू शकलो,
आज ते तुझी नझर बोलून गेली ..
माझ्याच नकळत, माझ्या मनातलं सार,
आज ती माझ्याच समोर मांडून गेली...
मी फक्त पाहतच बसलो,
तुझ्या त्या बोलक्या नझरांना...
अन पाहता पाहता,
कळलच नाही कधी, तू माझी होऊन गेलीस....
निळ्या त्या नयनात तुझ्या,
मला सारा आसमंत, आज तू दाखवून गेलीस...
मला सारा आसमंत...
आज...तू दाखवून गेलीस...

एकदा तरी मला स्वप्नात का होईना
पण हे सगळ बघायचं आहे .

बघायचं आहे मला
तुझ्या बाहुपाशात स्वताला विसावताना ,
बघायचं आहे मला
तुला माझ्या घट्ट मीठीत शीरताना .

बघायचं आहे मला
तुझे हात माझ्या केसात फिरताना .
बघायचं आहे मला
तुझे ओठ माझ्या कपाळावर अलगद टेकताना .

बघायचं आहे मला
माझी वाट पाहत तुला तल्म्लताना
बघ्याच आहे मला
तुला कावर्या बावर्या नजरेने गर्दीत माझा शोध घेताना .

बघायचं आहे मला
मी उशिरा आल्यावर खोट खोट माझ्यावर रागवताना ,
बघायचं आहे मला
माझी नझर चुकवून तू तुझे अश्रू हळूच पुसताना.




"तुला पाठविण्यासाठी ..........माझ्याकडे सोने नाही,♥

तुला पाठविण्यासाठी ............माझ्याकडे डायमंड नाही,♥♥♥

तुझ्या फोनसाठी .................माझ्याकडे क्रेडीट सुद्धा नाही,♥♥♥♥

माझ्याकडे आहेत ते फक्त चार मराठी शब्द ..........तुझ्याशिवाय मला राहवतच नाही!! "♥♥♥



मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...

ते एकमेकांत हरवून जाण एकमेकांना फुलासारखं जपण...
रेशमी बंधांना पुन्हा एकदा विणावंस वाटतंय...
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...

तुझा पहिला वहीला स्पर्श...
तुला पाहून लपवता न आलेला हर्ष...
सगळ सगळा पुन्हा अनुभावावसे वाटतंय...
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...

तुझं लाड लाड मला सार जग बक्षिसं देणं..
जोषात येऊन तू मला चांदणं तोडून देणं..
स्वप्नांच्या त्या विश्वात मला पुन्हा जगावंस वाटतंय..
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...

तुझं मला वेडू म्हणून हाक मारण..
मी चिडले की तुझं खोटा खोटा हसणं..
तूझे माझ्या वरचे प्रेम,पुन्हा एकदा अनुभवास वाटतंय...
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय..
तुझ्या मनातल गुपित,
तू कोणालाही न सांगण..
पण तुझ्या वागण्यातून,
ते मला नेहमीच कळन ...
आपण बरोबर चालताना,
तुझा हात माझ्या हाताला लागण,
अन सगळ्यांच्या नकळत,
तुझ हळूच माझा हात धरण...
कळत ग मला...
डोळ्याना सागितलय मी,आज राञ जागायची आहे
डोळ्याना सागितलय मी,आज राञ जागायची आहे
ऐकलय कि तुझि आठवण येणार आहे...
आज परत मला माझ्यातूनच नेणार आहे...
डोळ्याना सागितलय मी,आज त्याला त्याच्याकडून मागायचे आहे,
पापण्यानो तुम्हिही मिटु नका, आज राञ जागायची आहे...
ऐ चंद्रा जरा इकडे बघ, त्याची आठवण येणार आहे...
तुझा सौम्य प्रकाश दे, मला आठवणीत तो आज भेटणार आहे...
ए अश्रु, तु जरा थाब रे ... इतके दिवस आलास ना...
माझा म्हणता म्हणता तूहि त्याचा झालास ना...
तू आलास कि पापण्या मग मिटाच्या म्हणतात,
ऐ पापण्यो तुम्हिही मिटू नका निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा आज त्याला सागायची आहे डोळ्याना सागितलय मी आज राञ जागायची आहे.
ती हसते तेव्हा मोत्यांची सर हळूच तुटली वाटे
चांदण्यात भिजला चिंब चिंब तो चकोर नयनी दाटे!

ती हसते तेव्हा हृदयाच्या ठोक्यांची गडबड होते
क्षण एक थांबुनी तिला बघाया गुलबकावली खुलते!

ती हसते तेव्हा मनात "येथे स्वर्ग असावा" येते
ही हवा सुगंधी मल्मल होते मला मिठीशी घेते!

ती हसते तेव्हा डोळ्यांमधला सागर खळखळ करतो
मी पुन्हा एकदा खुळ्यासारखा तळास शोधत बसतो!

ती हसते तेव्हा गंधर्वांचे गान थांबते थोडे
तो सूर आठवा इथे राहतो सुटते त्यांना कोडे!

ती हसते तेव्हा मरगळ सरते दूर उदासी उडते
ना दु:ख राहते, चैतन्याने अंतरंग मोहरते!
इतकी जवळ येऊ नकोस कि माझी सवयच होऊन जाईल,
पाहू नकोस अशी कि प्रेम होऊन जाईल,
तुझ्या या भावनांना तू मनामध्येच राहू दे,
नाहीतर- ओठांच्या या गर्म श्वासांना पुन्हा एक बहाणा मिळून जाईल...




नजरेतल प्रेम
तुझ्या डोळ्यातलं टिपूर चांदण
माझ्या मनास वेड लावत!

तुझं ते चोरून बघणं
माझं ऊर खाली वर करतं
तुझं ते लाजून हसणं
माझ्या काळजात घर करतं!

तुझी ती नजर झुकवणं
माझ्या मनास खूप आवडतं
तुझं ते अबोल राहणं
माझ्या मनात प्रीत फुलवतं!

तुझ्या नजरेन मला खुणावण
तुझा गुलाम करून टाकत
तुझ्या मनातही आहे प्रीत
माझ्या मनास कळून जातं!

जेव्हा तुझ्या नजरेतल प्रेम
माझ्या नजरेला कळून जातं!
तुझ्या जवळ खूप जवळ
असावसं वाटतंय..
ओंजळीत तुझ्या अलगत येऊन
मिटावसं वाटतंय..

केसांतून तुझ्या हळुवार बोट,
लहारावस वाटतंय..
माझ्या ओठांवर तुझे शब्द.
गावसं वाटतंय..

क्षीण झालेला अश्रू
बिचारा उगीच कान्हतोय..
मनातील मऊ स्पर्श..
माझामध्ये रमतोय..

माझा अळसही हलके हसून
तू झेलावा वाटतंय..
क्षण जादू भरे सुगंधी व्हावे
सुगंधालाही वाटतंय...

आपल्यामधल निष्टुर अंतर
कमी व्हाव वाटतंय..
चौकटीच्या परीघावारती
तूच असावी वाटतंय..
मन असतं त्या फुलपाखरा सारखं...
स्वभावाच्या रंगांनी भरलेलं.....चंचल.....नेहमी कसल्या न कसल्या तरी शोधात भटकणारं....
ह्या मनाचा नक्की कोणता रंग कुणाला, का आणि किती वेळासाठी आवडेल हे भाकीत न मांडता येण्यासारखं असतं.

मन असतं कधी कधी त्या आकाशासारखं......
एकदम निरभ्र....सोबत दुसरं कुणीही नको हवं असणारं...
स्वत: सोबतच खूप खुष असणारं....
कधी कधी स्वतःचाच एखादा रंग नव्याने सापडला म्हणून आश्चर्याने फुललेलं.....
तर कधी स्वतःचाच एखादा रंग स्वतःलाच सापडत नाही,बहुतेक तो रंग हरवला म्हणून गोंधळलेलं.....

मन असतं त्या आकाशातल्या चंद्रासारखं......
कधी चांदण्यांनी वेढलेलं, कधी आठवणींनी छेडलेलं....
कधी कुणाला तरी वेड लावणारं...कधी कुणाचं तरी वेड घेणारं....
डाग असूनही कुणाच्या ना कुणाच्या आवडीत शामिल झालेलं....
कधी ग्रहणात अडकणारं....कधी पौर्णिमेत लख्ख प्रसन्न चमकणारं....
स्वतःच्या रंगांनी सागराच्या कोणत्या कोणत्या लाटेला भरती आणणारं....
आठवणीचा भुंगा कानामागे सतत भुंगत असतो....अस्तित्वाची जाणींव करून द्यायला.....

झाडांच्या पानांमधून सूर्यकिरणांच्या छोट्या छोट्या भेटी आपल्या पदरात येतात.....ओंझळ भरते.
मनाची ओंझळ कधीच भरत नाही...ती तशीच राहते....भरूनही रिकामी....
थोडं अजून हवं होतं.....आणि......अजून थोडंसं हवं होतं


स्व:भावालाही रंग असतो
एक गंध असतो
हे तुझ्या सहवासात आल्यावर कळलं

स्व:भावालाही चेहरा असतो
एक गोडवा असतो
हे तू भेटल्यावर कळलं

स्व:भावातही असते मादक नशा
गुंतवणारी अदा
हे तुझ्यामुळेच कळलं

स्व:भावही कुणाची ओळख असू शकतो
कुणालाही प्रेमात पडू शकतो
हे तुझ्या स्व:भावामुळे कळलं

स्व:भावातही इतकी ताकद असते
की जीव जडतो त्याच्यावर
हे तुझ्या स्व:भावाचा गुलाम झाल्यावर
अन त्याच्या प्रेमात पडल्यावर कळलं .


लाडात आलेला चेहरा
तुझ्या मनातले भाव
मला सांगून जातो

लाडात आलेला चेहरा
माझ्या मनातही
तुझा मोह जागवतो

तेव्हा त्या नजरेत
दिसते ओसंडून वहाणारी
प्रीत फक्त प्रीत

माझ्या मनातही तेव्हा
तू जागवतेस
प्रितीचे मधुर गीत

ती नशीली नजर पाहून
माझ्याही नकळत
मी तुझा होऊन जातो

लाडात आलेला चेहरा
तू अबोल राहूनही
तुझ्यावर प्रीत उधळायला लावतो .
मेघ सावळा बरसून गेला
आठवणी या जाग्या झाल्या
अजूनही स्मरती क्षण ते ओले
तुझ्याच संगे घालविलेले
पुन्हा कधी जरी तू ना दिसला
स्मृती आपुल्या कोरून गेला
मेघ बरसता वेली भिजल्या
शहारून त्या कंपित झाल्या
आधारास्तव शोधू लागल्या
अपुल्या अपुल्या प्रिय सखयाला
निसर्ग दृश्य हे डोळ्यापुढती
आठवणींचा गोफ उकलती
तुझ्यामुळे रे मेघा मजला
गतकाळाचा पट सापडला
हवाहवासा जो वाटत होता
एक जागा बघ जेथे सगळ काही सत्य असेल

एक जागा बघ जिथे सगळ्या विरुद्ध तुझा एक हात माझी हिम्मत असेल

एक जागा बघ जिथे तू माझी अन मी तुझा असेल 

समाज अन फ्यामिली ची कारणे देणार दुबळ जिथे प्रेम नसेल

मला न सांगता तू तिथे घेऊन चल....



एक जागा बघ जिथे कोणतच बंधन नसेल

एक जागा बघ जिथे  कोणतीच चूक प्रेमाहून मोठी नसेल

एक जागा बघ जिथे आपल्या प्रत्येक वेदनेचा मलम हा प्रीतीचा ओलावा असेल

सोबत येउन एकत्र राहताना कोणताही पाछ्तावा नसेल

मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...



एक जागा बघ जिथे राधा-कृष्णाहूनही आपल नातं महान असेल

जिथे अर्धांगिनी रुक्मिणी नसून प्रेमवेडी  राधाच असेल

कोणतेही कारण असो राधा सोडून रुक्मिणी जिथे वधू नसेल

विरहात जळणाऱ्या मीरेचीही जिथे कृष्णाला जाण असेल

मला तुझी अन तुला माझी कायम साथ असेल

मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...



मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...

मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...

लवकर मला तिथे घेऊन चल .....
पाहिले मी चंद्राला,
त्यात चेहरा तुझा होता.

सूर्यात, सूर्याच्या प्रत्येक किरनात,
प्रकाश तुझा होता.

फुलात,फुलाच्या प्रत्येक पाकळीत, पाकळीच्या गंधात,
सुगंध तुझा होता.

नदीत,नदितल्या शितल पाण्यात,
थंडावा तुझा होता.

या रम्य निसर्गात, निसर्गातल्या प्रत्येक पानाफुलात,
देखावा तुझा होता.

चित्रात, चित्राच्या प्रत्येक अंगात,
रंग तुझा होता.

अन्नात, अन्नाच्या प्रत्येक घासात,
गोडवा तुझा होता.

Wednesday, June 5, 2013

THANK YOU



गाली तुझ्या....

गाली तुझ्या खळी कशी
श्वास माझे अडकले

केस तुझे सखे जणू
रेशमांनी विणलेले

डाळिंबी ओठ तुझे
रसरशीत फुललेले

नेत्र तुझे हरिणीचे
स्वप्नातच दंगलेले

कांती तुझी नव्हाळीची
केतकीचे बन फुले

निमूळती बोटे तुझी
चित्र कुणी रेखियले

वळसे देहाचे खास
नेमकेच उमटविले

कोवळा गं बांधा हा
जाईची ती वेल झुले

चाल तुझी हंसगती
पाहूनी गं मन भरले

दिसशी तू मूर्तिमंत
काव्यचि ते बहरले

सारखी तू दृष्टिपुढे
मन वेडे खुळावले

तुझ्याविना सुचेना गं
जीव कसा तळमळे


तुझ्या मिठीत गारवा

तुझ्या मिठीत गारवा
धुंद फुंद हा नवा
तशात म्लान मोगरा
खुणावतो पुन्हा पुन्हा

असेच मत्त चांदणे
सुखावते तनामना
सतार वाजते जशी
मधुर नाद किणकिणा

नकोस जाऊ ना सखे
पहाट अजून व्हायची
अजून माधुरी तुझी
आकंठुनी प्यायची

तृप्त तृप्त आज मी
तरल सुखदवेदना
उमटू दे पुन्हा तना
तोच दंश त्या खुणा
ती चांदणी रात्र सखे,
सोबत तु साथीला...
तुझे निखळ सौदर्य पहात,
मी हा असा झिंगलेला...

शृंगाराची शय्याही ती,
बघ ना कशी सजलेली...
तुही अशी तिच्यावरती,
नव्यानवरीसम नटलेली...

निळेशार कुंतल तुझे,
मानेवरती रुळलेले...
मनही माझं वेडच ते,
त्यांच्यातच गुंतलेले...

गौरवर्णीय  अंगकांती ,
थरथरनारे ओठ तुझे...
ओठ तुझे मिठीत घ्याया,
ओठ माझे आसुसले... 

तुझ्या सागरी डोळ्यांच्या,
डोहात पार मी बुडलो...
नकळले मला कधी मी,
तुझ्या बाहुपाशात जखडलो...

तुझ्या गालांवर लाली,
बघ ना कशी फुलली...
तुझ्या गालांची मधुर खळी ती,
माझ्या ओठांआड दडली...

तुझ्या मधाळ ओठांशी,
माझे ओठ जुळले...
तुझ्या घट्ठ मिठीत नखांचे,
माझ्या पाठीवर व्रण उमटले ...

तुझी घट्ट मिठी ती,
तुझे उष्ण श्वास...
ती मनमोहिणी रजनी,
आणि मी मदहोश...

ती जात असताना तिला
घातली मी साद रे.....
दुराव्याने अन मांडला
सलगीशी वाद रे....

होते जरी सारे खरे
तरी भासले जाळे तुला
रंगलेला आपुल्या प्रेमाचा
मेळ सारा भंगला...

परी शेवटची विनंती हि
जाताना तू ऐकुनी घे...
तुझ्याजवळच्या त्या माझ्या
काळजाची काळजी घे...

ओठांत तुझ्या
वेडे शब्दही चिंब झाले
रहस्य मनातले मग ते
गुपचूप कानात सांगून गेले

रात्र सुद्धा बिचारी
तुझ्या डोळ्यात हरवली
चंद्राची चांदणी
मग दिवसा उगवली

वादळातला वारा  भरकटला
तुझ्या केसामध्ये जाऊन गुंतला 
सगळीकडे गोंधळ उडाला
वारा मात्र केसाच्या बटेबरोबर खेळत बसला

कपाळावरच्या बिंदीला
सूर्य भाळला
रोज आकाशात उगवणारा तो
आज मात्र तुझ्या भाळी उमटला

कमानदार तुझ्या कमरेखाली
इंद्रधनुष्य लाजला
सुटला तीर अन
काळजाला आरपार घुसला..


विता सुचते......त्याच्या पहिल्यावहिल्या भेटीवर
कविता सुचते......त्याच्या घट्ट मिठीवर
कविता सुचते......त्याच्यावरच्या रागावर
कविता सुचते......त्याच्या मला मनवाय्च्या चालाखीवर
कविता सुचते.....जेव्हा तो मला बघून गल्यातल्या गालात हसतो
कविता सुचते.....गर्दीत हरवू नये म्हणून त्याने नकळत पकडलेल्या हातावर
कविता सुचते.....संकटाच्या वेळी दिलेल्या त्याच्या आधारावर
कविता सुचते.....डोळ्यातल पाणी फुसण्यासाठी पुढे केलेल्या रुमालावर

कविता सुचते.....त्याच्यावरच्या प्रेमावर
.
.
.
.

कविता सुचते......त्याच्या आठवणींवर
आज तुझी खूप आठवण येतेय
आज तुझी खूप आठवण येतेय
आठवणी मनात दाटून
पाणी डोळ्यात येतेय
आज तुझी खूप आठवण येतेय
तुझा सहवासाचा सुगंध
आज घरभर दर्वळतोय 
किती प्रेम केले तू माझावर
किती प्रेम केले मी तुझावर
इतके प्रेम कसे रे आपण
जगापासून लपवून ठेवले
लपवून नाही आपण ते जपून ठेवले
दूर गेल्यावर आयुष्भर पुरावे
यासाठी ते जपून ठेवले
पण आज्ते जपलेले प्रेमपन
हरवल्यासारखे वाटते
आठवणी मनात दाटून
पाणी डोळ्यातून येतेय
का आपण एकमेकांपासून दूर गेलो
 खंत मनाशी सलतेय
आज तुझी खूप आठवण


तुझ्या गंधान
रोम रोम भारलेल असतं
प्रत्येक क्षणात माझं मन
तुझ्या प्रीत गंधान
मोहरलेल असतं
तू वावरत असतोस माझ्यात
अगदी जागे झाल्यापासून
निद्रिस्त होईपर्यंत
खरं म्हणजे अजूनही
विश्वास बसत नाही माझ्यावर
हे असंही घडू शकत आयुष्यात
पण तू आलासच असा
एक वादळ होऊन प्रेमाचं
कि जे मी कधी स्वप्नातही
विचार करू शकत नव्हते
कधी वाटलंच नव्हत असंही प्रेम
कुणी करू शकत कुणावर
निष्पाप अन निरागस
कुठलीही अपेक्षा न बाळगणार
म्हणून अजूनही हे स्वप्नच वाटतं
पण तुझ्यामुळेच कळला मला
खऱ्या प्रेमाचा अर्थ
अन प्रेमात बेधुंद जगणं
काय असतं ते हि
तूच जगणं झालायं
तूच जगणं झालायं .


माझ्या एका शब्दावर
तू तुझं काळीज
काढून देशील माझ्या तळहातावर
कळत नाही मला
इतकं कसं प्रेम कुणी
करू शकत कुणावर
पण तू अपवाद आहेस
या स्वार्थी जगात कुणी कुणाच नसतांना
माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी

माझा विश्वास आहे
तुझ्या प्रत्येक भावनेवर



जीवनाच्या धूंद स्मृति
क्षणांत मनीं उभरतात
अन हृदयांतील मंद मंद
श्वास क्षणभर अडखळतात

ठेवले तुला जतन करोनि
मम पापण्यांच्या पंखांत
कोरून तशीच ठेविली
तव रूपरेखा हृदयांत

सदैव तूं वास करतो
हृदयाच्या स्पंदनांत
नेत्रांतील मूर्ती तुझी
हळूच येते स्वप्नांत

तुला पाहते सदैव मी
जागेपणी वा स्वप्नांत
आधारावर त्याच एका
जीवन जगते एकांतात
वाटलं होतं
वादळी आयुष्यात माझ्या
तू पाऊस घेऊन येशील!
वळणा-वळणावर थांबलेल्या
जीवनाचा,  तू एक प्रवाह असशील!
विस्कटलेल्या त्या प्रत्येक नात्याचं
तू एक संकुल बनवशील!
मला कधीही न कळलेल्या
त्या प्रेमाची;
तू परिभाषा असशील!
निरर्थक, नाउमेद जगण्यास माझ्या
तू एक श्वास ठरशील!

पण वाटलं नव्हत
माझं अख्खं भावविश्वच तू
तुझ्या तळहातावर अलगद पेलशील!
मनाच्या गाभाऱ्यात माझ्या
तू एक प्रेमांकुर पेरशील!
अन वाळवंटी आयुष्यात माझ्या
तू दोन गुलाब उगवशील!
रुक्ष जीवनाचं माझ्या
तू नंदनवन करशील!

वाटलं नव्हतं
वादळी आयुष्यात माझ्या
तू पाऊस घेऊन येशील!
मी तुझी तू माझा

मी तुझी तू माझा

तू माझा प्राण सखा

अंतरीच्या गंध कळीला

उमलण्या श्वास तुझा

तू भ्रमर मी कुसुम

घालतसे  रुंजी मना

तू साद मी पडसाद

तुझा माझा सुख संवाद

तू सागर मी सरिता

मिलन त्यांचे मनात

मी आत्मा तू परमात्मा

युगा युगाचे अतूट बंधन

मी तुझी तू माझा

तू माझा प्राण सखा

Tuesday, June 4, 2013

मी कोमजे पर्यंत राणी तुला...
असाच धुंद सुवास देईन...
नटून थटून केसांत तुझ्या...
प्रीतीचा गं ध्यास घेईन...
रंग तर केव्हाच दिलाय...
एक आणखी भेट खास देईन...
लागलीच धाप तुला कधी...
तर उरलासुरला श्वास देईन.
माझी प्रेयसी

काय सांगू कशी आहे ती
शब्दच कमी पडतील तिला शब्दात
मांडायला...

तिचा तो तेजस्वी निरागस
चेहरा ज्याच्या तेजाने सुर्यालाही लाज
वाटेल ....

तिचे ते गोंडस रुप
तिला पाहून चंद्रमाही आकाशात लपेल....

तिचा स्वभाव,
जणू एखाद्या निश्पाप आणि चंचल
चिमुरड्यासारखा ज्याला कशाचीच
काळजी नसते फक्त हसत-खेळत रहाणे एवढेच
माहित असते...

कितीही नटखट आणि खट्याळ
असली तरीही ती समजुतदार पणाने
स्वत:ला सावरणारी अशीच आहे माझी"ती"

जिच्यावर माझ्यापेक्षाही जिवापाड प्रेम
करतो नेहमीच तिच्या आठवणीत
गुंततो
तिच्याशिवाय
मला आयुष्याची कल्पनाही करवत नाही



मागूनही जे मिळत नसतं
ते खरं प्रेम असत...
.
खूप समजावूनही जे
भरकटत असत
ते खरं प्रेम असत...
.
विसरलं तरी जे आठवत
असतं
ते खरं प्रेम असत...
.
वर वर हसलं तरी आतून
जे रडत असतं
ते खर प्रेम असत...
.
डोळे बंद केले तरी ते
दिसत..
.
ते खर प्रेम असत... ♥♥
हे बघ काय केलस तू....

कुणालातरी जगायला शिकवलेस तू...
कुणालातरी हसायला शिकवलेस तू...

कुणालातरी प्रेम करायला शिकवलेस तू...
कुणालातरी रडायलाही शिकवलेस तू...

माझा विचार न करता मला सोडून गेलीस तू...
पण हे बघ काय करून गेलीस तू...

कुणालातरी जगायचा अर्थ शिकवून गेलीस तू...
अश्रुंची किंमत समजावून गेलीस तू...

नात्यांची किंमत काय असते ते समजावून गेलीस तू...
विरहाचा अनुभव देऊन गेलीस तू...

एक शहान्याला वेडा करून गेलीस तू...
आणि एक वेड्याला कवी करून गेलीस तू ...

कधी कधी ( Good Night)म्हणजे Plz फोन ठेऊ नकोस
मला बोलायच आहे.
.
कधी कधी ( Bye ) म्हणजे, Plz थांब मला अजुन तुला डोळ्यात
सामावुन घ्यायच आहे
.
कधी कधी ( मला एकटराहायचय ) म्हणजे नको जाउस माझ्यासोबत राह!
.
कधी कधी ( I Hate υ ) म्हणजे, ILove υ so Much पण मला तुझा खुप राग आलाय.
.
कधी कधी (I am sory) म्हणजे
चुक तुझी आहे तरी पण मी आपल
नात वाचण्यासाठी
.
कधी कधी (Where r u) म्हणजे
मला तुझी खुप गरज आहे असशील
तिथुन ये माझ्यासाठी
.
कधी कधी (I ForgOt u) म्हणजे
मी तुला कधीच विसरु शकणार नाही तु
ह्रदयाच्या एका कप्प्यात नेहमीच
असशील
 



गंध कोवळ्या फुलांचा
त्यात श्वास सावळ्याचा..

देह लाजतो कळीचा स्पर्श
होत पाखराचा..

वाट चालता सख्याची होई
नाद पैजाणाचा..

प्रीत उंबऱ्या पल्याड शोधते
खुणा सुखाच्या..

गुंजते बासरी अंतरी ओल्या
प्रेम सरी..

रास रंगत भिनते अन क्षण
ते केसरी..

राधा बावरी बावरी
राधा बावरी..

राधा बावरी बावरी
राधा हि बावरी....

Monday, June 3, 2013


मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल
... पण तिला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण तिच्यासाठी
... न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ...
पण तिला नेहमी आनंदात ठेव,

माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल

. पण तिच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव,
माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,
कधी न रडणाऱ्या देवाचा डोळा पण तेव्हा पानावला,

का करतोस इतके प्रेम तिच्यावर जिने प्रेम तुझे स्वीकारले नाही,
का मरतोय तिच्यासाठी जिने जगणे तुझे मान्य केले नाही,

मी म्हटले सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला भेटतील,
जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात पडशील... "




प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे,
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी,
आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,
दुखवले कितीही त्याने तरी,
... ... ... हसून त्याच्या परत समोर जायचे असते,
कुठलीही अपेक्ष्या न ठेवता,
देत राहिल्याने प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,
म्हणूनच नाही मिळाले परत,
तरी निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते…...
समुद्र काटावर रंगीबेरंगी शिँपल्यांची रास असावी..
आपण गुंग होऊन त्यात खेळत बसावं..
अगदी सहजपणे त्यातला एक शिंपला उचलून उघडावा..
अन त्यात मोती सापडावा अगदी.. तुझ्यासारखा!!






प्रिये या जळणाऱ्या दिव्याची वात आहेस तू ..
आयुष्यभर मिळणारी एक प्रेमळ साथ आहेस तू..

तुझ्या प्रीतीत आयुष्याचा एक एक क्षण माझा मोहरून जावा ..
तुझ्या मिठीत जाताना लव ना लव , शहारून यावा ..

तुझ्या गरम श्वासांमध्ये मला माझा ही श्वास शोधायचाय ...
अन त्याच वेळी तुझ्या लाजऱ्या चेहऱ्यावरचा
आनंदी क्षण ही टिपायचाय...

तुझ्या ओठान्मधले मधाचे थेंब मला हवे आहेत ..
तुझ्या आयुष्यातले सोनेरी क्षण मला हवे आहेत..

ये प्रिये, आज दोघांमधले नकोसे अन्तर मिटवून टाक...
ज्योती मध्ये जळणाऱ्या पतंगाला तुझ्या प्रेमानेच उत्तर देऊन टाक.








कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही,
एक एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन, अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी, तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी, प्रेमळ मिठी साठी, एका भेटीसाठी..







दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला.........







आठवत त्या मुसळधार पावसामधे तु चिंब भिजून गेली होतीस
अन ओलेल्या मनाने मला बिलगून शांतपणे निजून गेली होतीस
खरच सांगतो त्या पाण्यामधे माझ काळीज बुडत आहे
तुझ माझ्यावर अन माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे
वाटत कधी कधी मनातली बात तुला कशी सांगून टाकावी
...अन ह्र्दयाची गाठ जमलच तर बांधून टाकावी
तूच समजाव माझ्या मनालाकारण तुला कळतं आहे
तुझ माझ्यावर अन माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे





प्रेम कधी ठरवून होत नाही,
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात,
रस्ते फुटत असतात....
एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात,
... आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते आणि नकळत
आपण एकाच वाटेवरुन समांतर चालु लागतो...
नंतर जवळ येतो…,एकमेकाला आधार देतो,
एकमेकाला सोबत करतो,
एकमेकाची दु:खे
वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...
प्रेम होते..!
काय जादु असते!
प्रेम शिकवते जगण्याचा खरा अर्थ
प्रेम बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
प्रेम देते आपुलकी अन विश्वास
प्रेम भारुन टाकते आपला श्वास अन श्वास..





मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.
प्रेमाच्या गोड गोष्टी करताना हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.
क्षण काही जगलोत सोबत आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ.
स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.
जिवापाड प्रेम लावीन तु थोडे तरी लावून बघ,
मी तर वेडा झालोच आहे तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.
जशी तू सामावली आहेस माझ्यात तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगला
एकरूपता तरी जाणवेल बघ.
नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी
तुझ्या मला असू दे बस्स...!!!!!!





तु अशी जेव्हा...
तु अशी जेव्हा जवळ येऊन बसते,
मनाच्या लाटांना भलतीच भरती येते,
हात ही नकळत तुला स्पर्शितांना,
भावनांना ही भलतीच मस्ती येते,
तुला चिटकून बसताना,
अंगात भलतीच गर्मी येते,






एक कविता तुझ्यासाठी
तुझ्या मैत्रीसाठी,
तुझ्या सोबत जगलेल्या,
प्रत्येक क्षणासाठी,
तू दिलेल्या निखळ प्रेम साठी,
दाटलेल्या गळ्यासाठी,,
भरलेल्या डोळ्यांसाठी,
तुझ्या अवखळपणासाठी,
तुझ्या निर्मल मनासाठी,
खोदितल्या जोडीसाठी,
जोडीतल्या गोडीसाठी,
एक कविता फक्त आणि फक्त तुझा साठी




"जरा ऐक ना, काहीसांगायचे आहे तुला.......
,
तुला भेटताना....... होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला,
तुला पाहताना........ .. हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला,
तुझ्या बरोबर चालताना........ ... हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला,
तू सोबत असताना....... सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला,
तू नसताना......... .. तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला,
तुज्या बरोबर बोलताना........ . होणारी शब्दांची धडपड ऐकवायची आहे तुला,
तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा........ हे सांगायचे आहे तुला,
तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुला.........प् रेमातील नाजूक भावना सांगायच्या आहेत तुला"

एक क्षण असावा
निवांत आपण दोघांसाठी...

आपण हि जाव फिरायला
गर्दीतून बाजूला
घरापासून दूर
जिथे फक्त एकांत.....

आपल्या आयुष्याची
स्वप्न रंगवू शकतो आपण
फक्त दोघांच्या संमतीने....

कधी हिरवळीत कधी समुद्र किनारी
तर कधी एखाद्या नाटकाला


मला माहित आहे
तुला सुधा आवडतील असे क्षण जगायला
चार चोघातून दूर मनसोक्त फिरायला....




या आठवणींना डोळ्यात
साठवू कसा मी
सांग तुझ्यात साठलेले
क्षन गोठवू कसा मी

मी सुखात तुझ्या
स्वार्थ शोधतो आता
सांग तुझिया आठवणींना
आठवू कसा मी

वाटला मज स्वर्ग
ठेंगणा होता जेव्हा
डोळ्यात अश्रू पुन्हा
दाटवू कसा मी
झुळूक वार्याची
मज बेभान करते
सांग ह्या वादळास
पाठवू कसा मी

मी कधी तुझ्यात असा
गुंतून कसा गेलो ?
सांग ह्या स्वप्नांना
थाटवू कसा मी

ह्या बोलक्या ओठांची
शपथ होती तुला
सांग शब्द पुन्हा
मुखी बाटवू कसा मी





भर दुपारी
वळवाच्या पावसाने
चेहऱ्यावर शिंपडावे
तृप्तीचे थेंब ....
तशी तुझी भेट !!!!!!

मिळावी दृष्टी
आंधळ्याला अचानक
अन त्याच्या डोळ्यांची व्हावी
या जगाशी भेट .......
तशी तुझी भेट!!!!!

भरतीच्या वेळी
सागराच्या लाटेने
येऊन भिडावं
किनाऱ्याशी थेट .....
तशी तुझी भेट !!!!!!

अवसेच्या रात्री
गडद अंधारात
काजव्याने चमकून
दाखवावं बेट.......
तशी तुझी भेट !!!!!!

शब्दांच्या जगात
संगीताच्या मैफिलीत
सुरांनी घ्यावी
गाण्याची भेट .......
तशी तुझी भेट !!!!!!





कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,
कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,
कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,
कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,
कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार.




खरच मन किती वेड असत...
खरच मन किती वेड असत,
कधी हसत कधी रुसत.
कधी कधी ते,
आपल्याकडेही नसत.
फिरत असत इकडे - तिकडे ...
हव ते मिळ्वन्यासाठी,
खरच मन वेड असत ...
पण का???
का??
जे हव असत
ते कधीच मिळ्त नसत????
पण,
जे मिळत नसत तेच का हव असत???
खरचं का मन् वेड् असत्????
कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...
आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...
वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-
या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत
गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...
घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला,
संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...
संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...
किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच
झाली,
माझ्या आठवणीने,
तुझी सुद्धा पापणी ओली केली..!!!!!!

सगळ्यांपेक्षा वेगळी तु नक्किच आहेस. .
पाण्यापेक्षाही खळखळूण तुझ हसण आहे..
फुलापेक्षाही नाजुक तुझ बोलण आहे..
स्वपनांपेक्षा सुदंर तुझ दिसण आहे..
पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे…….
...
काचेहुन ही निर्मळ तुझ मन आहे..
बाणां पेक्षा ही धारदार तुझे नयन आहेत…
मधा पेक्षा ही मधाळ तुझी वाणी आहे…
पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे……