पैंजनांचा नाद अगदी खुळा करते ती ..!!
मेहँदी च्या पावलांनी
घर भर फिरते ती
सोबत पैंजनांचा नाद
अगदी खुळा करते ती ..!!
मधेच सगळ्यांचा
नजारा चुकवते ती
सगळ्यांमधे मला
अचूक घेरते ती... !!
हल्ली सगळ काही
नजरेनेच बोलते ती
मी नुसती नजर दिली की
दचकून थांबते ती...!!
पदाराच्या टोकासोबत हल्ली
उगीच खेळते ती ..!!
कोण जाणे का पण
हल्ली मनात हासते ती.
No comments:
Post a Comment