NiKi

NiKi

Sunday, June 24, 2012



जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते...
ही भाषा शिकावी लागत नाही...
अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा आपोआपच येते...
भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर हळूच
विसावलेले त्याचे होठ... अन त्याक्षणी एका अनामिक ओढीने त्याला बिलगून
तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी तिची मिठी...
ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद शब्दांत नाही...
तिथे फक्त स्पर्शाचीच भाषा लागते...
शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात...
पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श अनुभवावेचं लागतात

No comments:

Post a Comment