NiKi

NiKi

Saturday, June 23, 2012



कान्हा तेरे बन्सुरी के,
गुन बडे न्यारे...
सुरावट मल्हाराची,
जरा छेड ना रे

लगी ये अगन कैसी...
तन लाही झाले,
तरसले मन अन्
घन आले घन आले
घन आले घन आले



कंकरी न मारो हरी...
घट रिता आहे,
बावरी मैं प्यासी सखी
काहे तू सताये
बदरवा... कारे कारे,
का रे ? झूठ बोले
तरसले मन अन्
घन आले घन आले
घन आले घन आले



लिपट गयी मैं कैसे ...
घट्ट आज तुला
अंगभर बरसात ....
रंग झाला निळा
घनःश्याम,.... हुई शाम,
आभाळ सांडले
तरसले मन अन्
घन आले घन आले
घन आले घन आले



तेरे होटोपे है हसी...
लाजूनी मी चूर,
उधाणली...रात बैरी,
पहाट ही दूर
राधा कान्हा.... आज पुन्हा
एकरुप झाले
तरसले मन अन्
घन आले घन आले
घन आले घन आले

No comments:

Post a Comment