NiKi

NiKi

Friday, June 22, 2012

माझा प्रश्न अन् तीचं ऊत्तर…




 मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…
मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा…
मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…
मी म्हणालो अरे पापण्या ओल्या ह ोतातविरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा…
मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा…
मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
मी विचारलं आता किती वाट बघायची तुझीसखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा…;
.

No comments:

Post a Comment