NiKi

NiKi

Friday, June 22, 2012



आषाढी घन गरजत होते,
सूर तुझे ते बरसत होते,
माझ्या नकळत गालावरती,
अश्रू माझे झरतच होते...!

धडाडधुडुम वारा होता,
अन्धारुनही आले होते,
'यमनाच्या'त्या सुरावटीवर,
जलधारान्चे नर्तन होते....!

अनादी नाद भरला होता,
डोळे तुझे मिटले होते,
निरोप तुझा घेऊ कसा मी,
माझे मीपण नुरले होते...!


कडाडकड अन वीज चमकली,
क्षणात कळले अपुले नाते,
जन्मजन्मीचा क्रुष्णसखा तू,
स्वरवेडी मी गवळण होते....!

No comments:

Post a Comment