NiKi

NiKi

Sunday, June 24, 2012



वेड लावतोस तूं कुणां कुणां !

हे मुरलीधर मनमोहना

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?


तुझ्या भोवती नाचती गौळणी

भान त्यातर गेल्या हरपूनी

थकूनी गेल्या नाच नाचुनी

विसरुनी गेल्या घरदारानां

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

रमले सारे गोकूळवासी

पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी

बागडती सारें तव सहवासी

करमत नाही तुजविण त्यांना

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

संसार सोडला राधेने

भारुनी गेली तव प्रेमानें

ध्यास घेतला तुझाच तिनें

तुजविण नव्हती दूजी भावना

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

मीरेचे तर प्रेम निराळे

विषालाही प्राशन केले

तुजसाठी सर्वस्व अर्पिले

कसा तारशी तुं भक्तांना

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

No comments:

Post a Comment