NiKi

NiKi

Sunday, June 24, 2012

काय असते आठवण?
मनात रुजलेली,
रंगात भिजलेली इंद्रधनुसारखी
सातही रंग उधळणारी,
कधी एकटेपणा वाटला तर,
... गोड स्मृती जागवणारी,
आणि कधी डोळे भरून आले तर, अश्रू म्हणून वाहणारी.
खरंच काय असते आठवण?
वर्तमानात राहूनसुद्धा भुतकाळात नेणारी,
कोणी दूर असले तरी जवळ असल्याचा भास देणारी,
... खरंच काय असते आठवण?
मनातील गोड आणि कटू स्मृतीँचा आस्वाद
तर कधी अचानकपणे पडणारा भास
हीच असते आठवण, खरंच
हीच असते आठवण..!!
♥ ♥ ♥ ♥

No comments:

Post a Comment