NiKi

NiKi

Friday, June 22, 2012

एक मैत्रिण आहे माझी...
माझ्या सोबत हसणारी
मी रडल्यावर मात्र...... माझे डोळे पुसणारी


एक मैत्रिण आहे माझी...
... नेहमी सलवार-कमीज़ घालणारी
साधेपणातच सौंदर्य आहे.... हे सिद्ध करणारी,


एक मैत्रिण आहे माझी...
हिशोबिपणे वागणारी,
तिच्या या सवयीमुळे.....माझे पैसे वाचवणारी,


एक मैत्रिण आहे माझी...
कठोरतेने वागणारी,
जरा ओरडलो की मात्र..... मुसू मुसू रडणारी,


एक मैत्रिण आहे माझी...
माझ्यावर सारखी चिडणारी,
न कळत मात्र.... माझ आयुष्य फुलवणारी,


एक मैत्रिण आहे माझी...
सर्वाना हवीहवीशी वाटणारी,
माझ्याशिवाय मात्र.... स्वतःला अपूर्ण मानणारी

No comments:

Post a Comment