कसे सोडवू मी सुखाचे उखाणे,
व्यथांचे उसासे कवटाळलेला...
जरी भासतो मी त्रुणांकुर हिरवा,
तरी ओंडका मी असे वाळलेला !
मला पाहिजे प्रिये आपुलकी,
अन् बोलकी, तुझी सावली...
झरा अपेक्षांचा सहज पाझरावा...
उपेक्षांच्या रणात जो आटला !
ज्वालामुखी, उधाणं अन् वादळे,
मलाच का म्हणती आपले ?
परंतू वार्याच्या झुळूकेस हलक्या,
श्वास माझा ही आसुसलेला !
नसे शांतता कुठे जीवनात,
किती प्रश्न, चिंता, शंका मनात
सुर्यासवे पहाटे शुचिर्भूत व्हावे,
क्षितीजाकडे हा प्रवास चाललेला
No comments:
Post a Comment