झाले आहे काय कळेना...नाही आज सुचत
काही !
पाणी डोळ्यांतील खळेना...नाही आज सुचत
काही !
वाटेना वाईट कशाचे.. होई दुःख न
कसलेही ...
थोडेही का रक्त जळेना...नाही आज सुचत
काही !
आयुष्याने रोज छळावे...याची खूप सवय
होती...
... तेही बेटे आज छळेना...नाही आज सुचत
काही !!
दारोदारी घालवला, जो आला तो दिवस,
परंतू -
बेचैनीची रात्र ढळेना...नाही आज सुचत
काही !
कोठेही का जीव रमेना....कोठे का मज
करमेना ?
ही एकाकी वेळ टळेना...नाही आज सुचत
काही !
हाकांचा कोलाहल आता झाला फारच
भवताली...
माघारी कोणीच वळेना...नाही आज सुचत
काही !
अंधारी ही वाट किती मी चालू...पायच
उचलेना -
का माझा रस्ता उजळेना...नाही आज सुचत
काही !
गेलो होतो दूर परंतू आलो आज परत य़ेथे...
मी कोठे का दूर पळेना...नाही आज सुचत
काही !
ज्ञानेशाच्या शब्दकळेचे व्हावे वारस ...पण
साधी -
- ही शब्दांची भिंत चळेना...नाही आज सुचत
काही !!
काही !
पाणी डोळ्यांतील खळेना...नाही आज सुचत
काही !
वाटेना वाईट कशाचे.. होई दुःख न
कसलेही ...
थोडेही का रक्त जळेना...नाही आज सुचत
काही !
आयुष्याने रोज छळावे...याची खूप सवय
होती...
... तेही बेटे आज छळेना...नाही आज सुचत
काही !!
दारोदारी घालवला, जो आला तो दिवस,
परंतू -
बेचैनीची रात्र ढळेना...नाही आज सुचत
काही !
कोठेही का जीव रमेना....कोठे का मज
करमेना ?
ही एकाकी वेळ टळेना...नाही आज सुचत
काही !
हाकांचा कोलाहल आता झाला फारच
भवताली...
माघारी कोणीच वळेना...नाही आज सुचत
काही !
अंधारी ही वाट किती मी चालू...पायच
उचलेना -
का माझा रस्ता उजळेना...नाही आज सुचत
काही !
गेलो होतो दूर परंतू आलो आज परत य़ेथे...
मी कोठे का दूर पळेना...नाही आज सुचत
काही !
ज्ञानेशाच्या शब्दकळेचे व्हावे वारस ...पण
साधी -
- ही शब्दांची भिंत चळेना...नाही आज सुचत
काही !!
No comments:
Post a Comment