तुझी प्यास व्हावी,
तुझा ध्यास व्हावा
कधी स्पर्श माझा...
तुला आठवावा,
सखे भोवताली....
तुझे श्वास नाही,
कसा मोगर्याचा...
मला वास यावा ?
तुझा छंद व्हावा,
तुझा शब्द व्हावा,
तुझ्या काळजाचा...
कधी ठाव व्हावा...
असे रात्र सारी....
सुखद पौर्णिमेची,
मला चांदण्यांचा...
सांग का त्रास व्हावा ?
तुझे गीत व्हावे,
तुझा सूर व्हावा...
तुझ्या नजरेत आनंद,
भरपूर प्यावा...
मुक्या आसवांची...
असे साथ माझी,
तुला हासण्याचा...
एहसास व्हावा !
No comments:
Post a Comment