NiKi

NiKi

Monday, June 25, 2012


अजूनही रुसुनी आहे
काही केल्या कळेना,
हरले माझे सारे प्रयत्न
पण अबोला हा काय सुटेना
माझ्याबद्दल मनी तुझ्या,
हा राग कसला आहे.....??
सांगशील का रे सख्या,
नक्की वाद कसला आहे...??
प्रेम करतोस माझ्यावर,
अजूनही मला आपलेच मानतोस,
... मग अबोला धरून मनात,
असा प्रक्यासारखा का वागतोस...??
तुझ्याशी बोलल्यावाचून,
मला मुळीच करमत नाही,
तुझ्या विचारांशिवाय मन माझे,
दुसरे कशातही रमत नाही..
तुझ्या या अबोला चे,
कारण तरी सांगून बघ,
निदान त्यासाठी तरी एकदा,
माझ्याशी बोलून बघ..

No comments:

Post a Comment