NiKi

NiKi

Friday, June 22, 2012



माझं प्रेम सदैव माझा सोबत असतं,
जिथे जावं तिथे वावरत असतं.

रात्री झोपले तर स्वप्नात असतं,
पाऊसात भिजलं की थेंबात असतं.
थंडीत गेले तर गारठ्यात असतं,
जिथे जाईल तिथे वावरत असतं.

हसले तर माझ्या गालात असतं,
रडले की माझ्या डोळ्यात असतं.
विचार करताना विचारात असतं,
जिथे जाईल तिथे वावरत असतं.

दूर गेले की आठवणीत असतं,
गाणे ऐकले की गाण्यात असतं.
आरशात पहिले की आरशात असतं.
जिथे जावं तिथे वावरत असतं.

लग्न झाल्यावर कपाळी असशील,
सासूबाई नसल्यावर पदरी असशील.
लग्न झाल्यावर असंच असतं,
प्रेम मात्र माझं वावरत असतं.

भांडण झाल्यावर मौनात असशील,
मी माझ्या अन तू तुझ्या घरी असशील.
भांडण नेहमी होतच असतं,
प्रेम मात्र माझं वावरत असतं.

माहेरी जाताच फोन वर असतं,
रात्र झाल्यावर चंद्रात असतं.
करमत नसल्यास सासरच्या दारी असतं,
प्रेम मात्र माझं वावरत असतं.

दूर जाताच अश्रूत असतं,
सात जन्माच्या बंधनात असतं.
आणि
जिथे जावं तिथे वावरत असतं.

माझं प्रेम सदैव माझा सोबत असतं,
जिथे जावं तिथे वावरत असतं.

No comments:

Post a Comment