का??? काय? काय आवडलं
तुला प्रेम करण्यासारखं
तेव्हा तो तिला सांगतो कि तो का करतो प्रेम
तिच्यावर एक असेल तर सांगू न
मला जेवायला जरा तरी उशीर
झाला कि जेव्हा ओरडतेस
ना त्या काळजी वर प्रेम करतो मी
मुलींबद्दल जरा मस्करीने काही बोलल्यावर तुला येणाऱ्या रागावर प्रेम करतो मी
रस्त्यावर आघावपणा करणाऱ्या टपोरीला एक वाजवून ठेवण्याच्या त्या धाडसिपानावर प्रेम करतो मी
उलट, कोणी काही बोलल्यावर
डोळ्यांत टचकन पाणी आणणाऱ्या त्या निरागसतेवर प्रेम करतो मी
मूड चांगला असेल तर माझी जी खेचाखेची करतेस त्या आघावपणावर प्रेम करतो मी
लहर आल्यावर माझ्याशी कधी कधी FLIRT करतेस न त्या चावटपणावर प्रेम करतो मी
साडीवरचे फोटो दाखवणाऱ्या त्या दिलखुलास त्या मुलीवर प्रेम करतो मी
काही निर्णय घेण्याआधी विषयाची जी चिरफाड करतेस न त्या विचारीपणावर प्रेम करतो मी
दुस-या मुलींचं नाव घेऊन चिडवतेस
ना त्या खोडकरपणावर प्रेम करतो मी
कळत न कळत माझ्या जवळीकीवर
घाबरणाऱ्या त्या घाबरट अल्लड मुलीवर
प्रेम करतो मी
मनातले दु:ख न सांगता डोळे माझ्यासमोर ओले करतेस त्या माझ्यावरच्या तुझ्या विश्वासावर प्रेम करतो मी
सुख दु:खात न चुकता काजळ लावणाऱ्या त्या निरागस टपोऱ्या डोळ्यांवर प्रेम करतो मी
मला दम देणाऱ्या वेड्या मुलीवर प्रेम
करतो मी
दुसऱ्याला समजून घेणाऱ्या शहाण्या मुलीवर प्रेम करतो मी
कधी आघव कधी गोड, कधी रागट
कधी खट्याळ अशा मिश्र स्वभावावर
तुझ्या प्रेम करतो मी
स्वतः: च्या स्तुत्ती वर चमकणाऱ्या आणि लाल बुंद झालेल्या गालांवर प्रेम करतो मी
डोळे वर
ना करता बोलणाऱ्या त्या लाजाळू
मुलीवर प्रेम करतो मी
१-२ रुपयासाठी बाजारात
भांडणाऱ्या त्या मुलीवर प्रेम करतो मी
अशी हि माझी मैत्रीण आयुष्यभर सोबत
राहावी म्हणून
जीवनसाथी करावी तुला इच्छा ठेवतो मी
तू जरी नाही म्हणालीस तरी हे
तुझ्यावरच आयुष्भर प्रेम करीन मी
आणि हो लाजून हो देऊन माझ्या मिठीत लपशील न त्या वेड्या मुलीवर प्रेम करतो मी
किंवा जर नाही म्हणालीस तर
मला वाईट वाटेन म्हणून कासावीस
होणाऱ्या या मुलीवर प्रेम करतो मी ..
No comments:
Post a Comment