“कोण आहेस तू माझा….तुला कसं रे सांगू….?
श्वास माझा तू …पण उत्तर शब्दात कसं मांडू?
जग माझं आता तुझ्यापासून सुरु होतं,
तुला आठवणंच माझ्या हास्याला आता पुरं होतं..
…
तुझ्याशिवाय जगणं आता नाही रे जमत,
तुझ्याशिवाय मन आता कुठेच नाही रमत…
अंधारलेल्या वाटेवर हात नाही सोडणार ना?
विश्वास माझा तुझ्यावरचा कधी नाही मोडणार ना?
वचन नको मला…पण साथ दे तुझी…
तुझ्या सोबत जगण्याची स्वप्न आहेत माझी..
नको हा दुरावा….आता मला सहन नाही करायचं,
ठरवलंय आता फक्त तुझ्या तुझ्यासोबतच जगायचं……..♥
No comments:
Post a Comment