NiKi

NiKi

Monday, June 25, 2012

तुझे नि माझे नाते कसले?.. मजला उमगत नाही..
या जन्मीचे की गत जन्मीचे?.. काही समजत नाही...

काय नाव मी देऊ याला? सखे तुला तरी कळेल का?
गूढ-गहन प्रश्नाचे उत्तर.. सांग कधि ग मिळेल का ?

अवचित एका वळणावरती.. गाठ आपुली ही पड्ली...
निमिषा मध्ये क्षणाक्षणाची.. रेशीमनाती बघ जुळली..

सत्य प्रेम.. शिव ही प्रेम.. प्रेमच सुंदर आहे..
क्षणीक नश्वर जगती अंति.. प्रेमच अमर आहे....

प्रीत असे या अवनी वरती.. कोरिव सुंदर लेणे..
शिल्पी याचा ईश्वर.. हे तर.. परमेषाचे देणे...

त्याच्या मर्जी शिवाय जगती.. पान ही हालत नाही..
त्याच्या इच्छेपुढ्ती आपुले.. काही चालत नाही...

दुःख- वेदना क्षणाक्षणाला.. देऊन नियति जरि हसते...
तिच्याच करणी मध्ये खरे तर..भलेच आपुले परि असते..

नात्या मध्ये आपुल्या राणी.. अवचित आता मज कळते...
गूढ -गहन प्रश्नाचे कोडे.. अलगद-भरभर उलगडते..

चांगलं-वाईट, चुक-बरोबर? कशाला प्रश्नात पडायचे..
तुझ्या नि माझ्या सहवासाच्या.. क्षणाक्षणाला.. जपायचे

No comments:

Post a Comment