NiKi

NiKi

Tuesday, June 26, 2012

"तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही... ??
तुला काय वाटतं... मला तुझी आठवण येत नाही... ??

ठीक आहे.. तुझ्या सारखी कविता वगैरे करायला नसेल जमत मला...
पण म्हणून काय तुझी आठवण कमी होत नाही...

... आजपण देवासमोर हाथ जोडून डोळे मिटते तेंव्हा फक्त तुझाच चेहरा समोर येतो... " 'त्याची काळजी घे रे देवा, वेडा आहे तो' असं करत माझ्या प्रार्थनेतला अर्धा हिस्सा आजही तूच नेतो.. !!!!!
...
एवढंच की मी कधी ते बोलून दाखवलं नाही...
जखम झालीये मलापण पण मी ती अजून कोणाला खोलून दाखवली नाही...

हो रडले मी... एकट्यात खूप रडले..
तू नाही म्हणाला होतास तरी रडले...
पण ते नव्हतं तुला दुखावण्यासाठी...
एक भाबडी आशा होती ती..
की नेहमीसारखा येशील तू कुठूनतरी माझे अश्रू पुसण्यासाठी ...
की नेहमीसारखा येशील तू कुठूनतरी माझे अश्रू पुसण्यासाठी......

♥ " I really love u a lott " ♥

No comments:

Post a Comment