NiKi

NiKi

Friday, June 22, 2012

ती : काय रे किती तुझी वाट पहायची,
सांग काय करू तुझ्यासाठी कि फक्त एकदा मुसळधार बरसशील तू ?
किती रे तुझी वाट बघून सतत ती खिडकी खोलायची
नेहमीच आलास असा भास होतो पण... बाहेर डोकावल्यावर कळते
तो नुसताच आभास असतो .... किती राग गावे तुझ्यासाठी आत...ा तरी ये


तो: सांग खरच काय करशील तू माझ्यासाठी ................ ?
सगळे राग गाऊन तर झाले तुझे आता काय करशील ?


ती : तुझी वेड्यासारखी वाट पाहते ना मी .... म्हणून सगळे हसतात मला ....
तरीही हि तू येशील अशी आशा आहे मला ....
अजूनही खिडकी उघडीच आहे फक्त तुझ्यासाठी ......
मी इतकी आतुर आहे तुझ्यासाठी आणि तू मात्र येत नाहीस
फक्त एकदाच - फक्त एकदाच बेभान होऊन बरस ओली चिब व्हायचे आहे मला
तुझ्या थेंबा -थेंबा मधला स्पर्श अनुभवायचा आहे
मला.....................

No comments:

Post a Comment