आज अवघा आनंदाचा भर आहे
उत्साहात न्हालेले घर आहे
चार दोन क्षण बसशील का?
नेहमी तू माझी असशील का?
उद्या काळे ढग भरुन येतील
माझ्यावर चाल करुन येतील
तेंव्हा तू कंबर कसशील का?
तेंव्हा तू माझी असशील का?
कधी मोहाचे क्षण येतील
भुलभुलय्ये पण येतील
तेंव्हा तू तेथे फसशील का?
तेंव्हा तू माझी असशील का?
घर वादळात उडून जाईल
संसार पाण्यात बुडून जाईल
चार काटक्या तू वसशील का?
तेंव्हा तू माझी असशील का?
No comments:
Post a Comment