तुझी आठवण म्हणजे प्रेमाचा हळुवार स्पर्श
तुझी आठवण, गुंतलेल्या भावनांचा हर्ष
तुझी आठवण म्हणजे सर्वत्र कुंद कंद वातावरण
तुझी आठवण, जसं प्रितीने भरले्लं अं:तकरण
तुझी आठवण म्हणजे आनंदाची दिवाळी
तुझी आठवण, वाळवंटात फुलांची मांदियाळी
तुझी आठवण म्हणजे तीव्र उन्हात गार वारा
तुझी आठवण, नकळत गॊड शहारा
तुझी आठवण म्हणजे तु जवळ असण्याचा भास
तुझी आठवण, जीवन जगण्याची आस
तुझी आठवण म्हणजे जीवनगाण्याचा स्वर
तुझी आठवण हाच देव्हाऱ्यातला ईश्वर
No comments:
Post a Comment