NiKi

NiKi

Thursday, June 21, 2012



तू आणि तुझं सर्व विश्व...

तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
... ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती ...

No comments:

Post a Comment