NiKi

NiKi

Thursday, June 21, 2012

तुझं येणं ...

पहाटेचं दहीवर ...

चिंब भिजून जावं अलगद ...

फुलं उमलत जावीत मनातल्या मनात ...

जसा बकुळी गंध ...

... तुझे शब्द टपटपणारी फुलं ...

घ्यावित वेचून ओंजळ भरुन ...

तुझा स्पर्श जुईची शिंपण ...

हलके मुलायम सुखाचं गोंदण ...

तुझं जाणं ...

पानगळ वेलींची पून्हा येण्यासाठी ..

अन् डोळे तुझ्या प्रतिक्षेत ..

चातक पक्षी ..!!

No comments:

Post a Comment