तुझ्या परतीकडे डोळे
वाट लाऊन बसतात,
अनेक आभासी प्रतिमा
डोळ्यांना छेदून जातात.
अश्रुंचे दवबिंदू
बांध फोडून देतात,
घरट्यात विसावण्यासाठी
तेही थबकतात.
सुखद टपोरे क्षण
क्षणोक्षणी डोकावतात,
स्मृतींचे मोरपिसे
मनाला स्पर्शून जातात.
तुझ्याच चरणाशी
सर्वस्वी सुमने पडतात,
तूच माझे जीवन
तेच नाते ठरवतात.
तुझ्या मिलनासाठी
हे श्वासही अडकतात,
अश्रूच सामोरे येऊन
वेड्या मनालाही समजावतात.
तुझ्या पावलांची चाहूल
कानही वेध घेतात,
मागे वळून पहिले असता
पाऊलेही अदृश्य होतात.
वेडे मन वेडे पाखरू
पदोपदी तुझ्यासाठी भिरभिरतात,
क्षणभर विसावा घेऊन
चातक प्रवासाला निघतात.
No comments:
Post a Comment